आपल खान्देश

वीस वर्षांनी पुन्हा भरली शाळा, पिंपळगाव बांबरुडच्या माध्यमिक शाळेच्या विध्यार्थ्यांचे स्नेह संमेलन उत्साहात

भडगाव |

शाळेतील सवंगडी, शाळेचा वर्ग, लाकडी बाक यांची आठवण प्रत्येकाच्या मनात आयुष्यभर घर करून असते. शाळा सोडल्यावर पुन्हा लाकडी बाकांवर बसण्याची इच्छा अनेकांच्या मनात वारंवार येतेच. म्हणूनच पिंपळगाव बांबरुडच्या माध्यमिक व उच्च माध्यमिक  विद्यालयातील 2004- 2005 वर्षीच्या दहावी बॅचचे माजी विद्यार्थी स्नेहसंमेलनाच्या निमित्ताने एकत्र आले होते. 20 वर्षांनी जुने सवंगडी पुन्हा भेटल्याने जुन्या आठवणींना उजाळा मिळाला.

पहा येथे आपला युट्युब व्हिडीओ

भडगाव तालुक्यातील पिंपळगाव बांबरुडच्या माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात आज 2004 – 2005 च्या दहावीच्या माजी विध्यार्थ्याचा आज संस्मरणीय असा स्नेह मेळावा आयोजित करत आपल्या जुन्या आठवणींना उजाडा देण्यात आला, पुन्हा एकदा वीस वर्षांनी शाळेचे वर्ग भरले.

तब्बल २० वर्षांनंतर सर्व वर्गमित्र परत एकाच मंचावर आले होते. धकाधकीच्या जीवनातून  2005 बॅचच्या काही माजी विद्यार्थ्यांनी एकमेकांशी संपर्क साधून स्नेहमेळावा घेतला. त्यासाठी त्यावेळचे सर्व वर्गमित्र व शिक्षकांना आमंत्रित करण्यात आले होते. शाळेच्या इमारतीत माजी विद्यार्थी व शिक्षकांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्यद्यापक बी जी पाटील सर सर्व आजी माजी शिक्षक उपस्थित होते. यावेळी उपस्थित अध्यक्ष व सर्व आजी आणि माजी शिक्षकवर्ग तसेच प्रमुख पाहुणे यांचा माजी विद्यार्थ्यांनी शाल, पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन सन्मान केला.

आपल्या अध्यक्षीय भाषणातून मुख्याध्यापक यांनी येणारा काळ व पालक म्हणून तुमच्या समोरची आव्हाने याची विद्यार्थ्यांना जाणीव करुन देत त्यांना यशस्वी वाटचालीस सदिच्छा दिल्या. विद्यार्थ्यांच्या विविध क्षेत्रातील यशाबद्दल व असा उत्कृष्ठ कार्यक्रमाची संकल्पनेचे यशस्वी आयोजन करुन आम्हा सर्व शिक्षकांना सन्मानित केल्याबद्दल मुख्याध्यापक  बी.जी.पाटील यांनी विद्यार्थ्यांचे मनापासून आभार व्यक्त केले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे