महाराष्ट्रराजकीय

आदित्य ठाकरे विधानसभेत येताच नितेश राणेंकडून म्याऊ म्याऊच्या घोषणा

आज हिवाळी अधिवेशनाचा दुसरा दिवसही वादग्रस्त सुरु झाला. विरोधक आणि सत्ताधारी यांमधील आक्रमक पवित्र लक्षात घेता संपूर्ण वातावरण तापलेले पाहायला मिळाले. यातच राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे हे विधानसभेत प्रवेश करत असताना विधिमंडळाच्या पायरीवर आंदोलन करत बसलेले भाजप आमदार नितेश राणे यांनी आदित्य ठाकरे याना पाहून म्याऊ म्याऊच्या घोषणा दिल्या.आज दुसऱ्या दिवशी भाजप सदस्य आक्रमक झालेले पाहायला मिळाले.

विधान भवनाच्या पायरीवर बसून विरोधकांनी जोरदार घोषणाबाजी सुरु केली. आमदार नितेश राणेदेखील यामध्ये सहभागी होते. शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन , परीक्षा घोटाळा, या मुद्द्यांवरून सरकरविरोधात घोषणाबाजी केली जात होती. यावेळी आदित्य ठाकरे हे मंत्री सुनील केदार यांच्यासह विधानसभेत जायला निघाले त्यावेळी, नितेश राणे यांनी म्याऊ… म्याऊ… म्याऊ अशा घोषणा दिल्या. यावर भाजप नेते हसले देखील.

आदित्य ठाकरेंच्या धमकी प्रकरणावर नितेश राणेंचे भाष्य

आदित्य ठाकरे यांना मिळालेल्या धमकी प्रकरणी नितेश राणे यांनी भाष्य केले. धमकी देण्यासारखं ते काय करतात? त्यांना कोणत्या आवाजात धमक्या आल्या? असा खोचक सवाल राणेंनी उपस्थित केला. आदित्य ठाकरेंनी रात्री 7 आणि 8 नंतरच्या बैठका बंद कराव्यात म्हणजे त्यांना धमक्या येणार नाहीत, असा जोरदार टोला आदित्य ठाकरे यांनी लगावला.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे