आपल खान्देशमहाराष्ट्र

मुंबई विद्यापीठ कर्मचारी पतसंस्थेत प्रथमच खान्देश सुपुत्र कृष्णकांत परदेशी यांची बहुमतांनी संचालकपदी निवड झाल्याने त्यांचा सत्कार

कल्याण (प्रतिनिधी) मुंबई विद्यापीठ कर्मचारी सहकारी पतसंस्थेत प्रथमच खान्देशातील सुपुत्र कृष्णकांत परदेशी यांची बहुमतांनी संचालकपदी निवड झाल्याने मुंबईतील खान्देशी लोकांनी त्यांचा सत्कार कल्याण येथे करण्यात आला.

 सदर प्रसंगी डॉ बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतीबा फुले, पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. शंकर मोरे, ज्ञानेश्वर परदेशी, देवा लांडगे, दिलीप हरणे, देवराम कंणखरे , राहुल परदेशी यांच्या सह रमेश आबा परदेशी, रविंन्द्र फकिरा परदेशी, राजपुत सर, सुनिल शंकर परदेशी, अरुण जाधव, गणेश गढरी इ. आपले मनोगत व्यक्त केले, सत्कार मुर्ती यांनी सांगितले कि माझी सेवा फक्त आठ वर्षेच झालेली आहे, माझ्या समोर सिनियर व अनुभवी लोकांचा पॕनल होता, तरी देखील माझ्या पॕनलला ७ जागा मिळाल्या व यापुढे सर्वाना सोबत घेवुन चालणार मिळालेल्या संधीचे सोने करेन असे सांगुन धनगर समाज संघर्ष समिती महाराष्ट्र राज्य, उत्तर महाराष्ट्र धनगर महासंघ , धनगर समाज उन्नती मंडळाच्या पदाधिकारी व मित्र मंडळीचे आभार मानले, ज्ञानेश्वर परदेशी यांनी सांगितले कि माझे काका गेंदा नागो परदेशी हे दोन वेळेस कुसुंबा गावाचे सरपंच तर काकू एकवेळेस सरपंच, एका च घरात तीन वेळेस सरपंच पद भुषवण गावाची सेवा केली, त्याचा आर्दश मी घेवुन १५ वर्षे ठाणे पालघर शिक्षक पतसंस्थेचा संचालक व सचिव, ठामपा संघटनेचा अध्यक्ष, उत्तर महाराष्ट्र धनगर महासंघा अध्यक्ष व सध्या धनगर समाज संघर्ष समितीचे सचिव पद सांभाळून समाज सेवा करत आहे, आता कृष्णकांत ही आमची तीसरी पीढी आहे, कारण सेवा ही रक्तात असावी लागते, ती उसणवारीने मिळत नाही ती आमच्या रक्तातच आहे. सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्येष्ठ समाज सेवक सेवानिवृत्त मुख्याध्यापक  शंकर मोरे, समाधान मोरे, अमोल शंकर परदेशी, राजेंन्द्र गढरी,हेमंत परदेशी,सुनिल लांडगे, विनोद गुजेला, राजेंन्द्र शिवराम परदेशी,संजय परदेशी उपस्थित होते, अतिशय सुंदर सुत्रसंचलन राकेश पुंडलीक परदेशी यांनी केले.

 

माजी खासदार डॉ विकास महात्मे राष्ट्रीय अध्यक्ष धनगर समाज संघर्ष समिती, बापुसाहेब हटकर संस्थापक सल्लागार उत्तर महाराष्ट्र धनगर महासंघ, बापुसाहेब शिंदे, बाबासाहेब दगडे, डॉ.अरुण गावडे उदयोजक शंकर कोळेकर, दिपक कुरकुंडे धनगर प्रतिष्ठान, उद्योजक रुपेश थोरात यांच्या सह अनेक समाज बांधवानी शुभेच्छा दिल्या व अवध्या दोन तासातच वाटसप मॕसेज वर समाज बांधव व मित्र परिवार उपस्थित राहिल्या बददल आभार मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रमेश आबा, सुनील शंकर परदेशी, संदिप पांढरे, सुनिल मनोरे, सुधाकर परदेशी इ.परिश्रम घेतले.

 

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे