आपल खान्देश

नदी जोड प्रकल्प नारपारसाठी पाचोरा मनसेचे आरपार आंदोलन..

संपूर्ण उत्तर महाराष्ट्रसाठी अत्यंत महत्त्वाच्या असणाऱ्या नारपार नदीजोड प्रकल्प हा नुकताच केंद्रीय मंत्र्यांकडून रद्द करण्यात आला असून व्यवहारिक नसल्याचे कारण दिल्या गेले आहे याच्या निषेधार्थ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून निषेध रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार असून निवेदन आज मनसेचे जळगाव जिल्हा सरचिटणीस शुभम पाटील यांच्या नेतृत्वात पाचोरा येथील संबंधीत प्रशासन अधिकारीनां देण्यात आले.

नार-पार, औरंगा व अंंबिका या चार पश्चिमी वाहिनी नद्या महाराष्ट्र राज्यात उगम पावून पश्चिमीकडे वाहत जाऊन अरबी समुद्राला मिळतात, हे अतिरिक्त पाणी उपसा करून पूर्वेकडील अतितुटीच्या गिरणा उपखोऱ्यात शेती व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी ही योजना प्रस्तावित असता या उत्तर महाराष्ट्र सुजलाम सुफलाम होणार यासाठी हा प्रकल्प होणे अत्यंत महत्त्वाचे असून कित्येक वर्षानंतर या प्रकल्पाला रद्द करण्यात आले आहे खर तर हा प्रकल्प जळगाव जिल्ह्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असून त्यामुळे जिल्ह्यातील शेतीच्या पाण्याची तसेच पिण्याच्या पाण्याची कायमची समस्या दूर करता आली असती एवढेच नाही तर जिल्ह्याला उद्योगासाठी सुद्धा हा प्रकल्प खूप महत्त्वाचा होता त्याचा केंद्र सरकारने फेरविचार करून पुनश्च हा प्रकल्प होण्यासाठी प्रयत्न करावे जेणेकरून जळगाव जिल्ह्याला याचा लाभ होईल परंतु जिल्ह्यातील तीन मंत्री असताना सुद्धा एकाही मंत्र्याने साधी स्टेटमेंट सुद्धा या विषयावर दिल्ली नसून आपले राजकारणी किती आसंवेदनशील झाले आहेत हे याच्यातून दिसून येते जिल्ह्यात तेरा आमदार असून एकाही आमदाराने साधा निषेध सुद्धा नोंदवला नाही खरंतर अशा राजकारण्यांची जनतेने येणाऱ्या निवडणुकीत त्यांची जागा दाखवणे गरजेचे आहे याचा निषेध म्हणून मनसेचे जिल्हाध्यक्ष अनिल वाघ यांनी नुकतेच जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले असून लवकरच हा निर्णय फेरविचार करण्यात यावा नाहीतर मनसे जिल्हाभरात तीव्र आंदोलन छेडेल अशा आशयाचे निवेदन दिले होते त्याचाच भाग म्हणून दिनांक 12 रोजी पाचोर्‍या त रास्ता रोको घेणार असल्याचे निवेदन नुकतेच प्रांताधिकारी यांना देण्यात आले असून तशी माहिती तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर ठाकरे यांनी दिली त्यावेळी शहराध्यक्ष ऋषिकेश भोई उपशहर अध्यक्ष यश रोकडे रोहित पाटील श्रीकृष्ण दुंदुले वाल्मीक जगताप निलेश मराठे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे