आपल खान्देश

चाळीसगाव शहरातील नगरपालिका हद्दीतील एक एकर जागा हिंदू स्मशानभूमीसाठी त्वरित द्या..!

नगरपालिकेने जागा मोजणीचे चलन, त्वरित भरून कायदेशीर पूर्तता करावी. जेणेकरून हिंदू समाजाच्या लोकांचे स्मशानभूमीची जागा जनतेसाठी उपलब्ध होईल यासाठी राष्ट्रीय बजरंग दल आणि आंतरराष्ट्रीय हिंदू परिषदच्या कार्यकर्तेनी दिले निवेदन

चाळीसगाव शहरात हिंदू स्मशानभूमीची जागा 33 वर्षापासून अंत्यसंस्कारासाठी जनतेसाठी खुली केलेली नाही,  शहरातील नगरपालिका हद्दीतील सर्वे नंबर 425 / क मधील हिंदू स्मशानभूमीसाठीची एक एकर जागा त्वरित पारित करावी अन्यथा राष्ट्रीय बजरंग दल आणि आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद तर्फे तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल असे निवेदन पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी दिले.

चाळीसगाव नगरपालिका हद्दीतील मालेगाव- धुळे रोड चौफुली वाय पॉईंट, के. आर. कोतकर कॉलेज कॅन्टीनच्या बाजूला सर्वे नंबर ४२५/क मधील धुळे रोडटच ,जुन्या कँटीन पासुन ते ट्रामा रुग्णालयाच्या कंपाउंडच्या भिंतीपर्यंत १.१७ हे. आर (पावणे तीन एकर) जागा नगरपालिकेने मंजूर केलेली आहे.या संदर्भात खालील ठरावा क्रमांका नुसार मंजूर आहे.

  • दिनांक १२/०७/१९९१ रोजीचा ठराव क्रं ११२३- १ एकर – हिंदू स्मशान भूमीसाठी
  • दिनांक ०१/११/१९९३ रोजीचा ठराव क्रं ३५९- १ एकर – मुस्लिम स्मशान भूमीसाठी
  • दिनांक १८/०३/२०१३ रोजीचा ठराव क्रं ३८५ – ०.३७ आर क्षेत्र मांग गारुडी समाजासाठी

रेल्वे पलीकडील धुळे रोड,मालेगाव रोड, करगाव रोड स्थित पंचशील नगर, जुना मालेगाव रोड नाका, शिव कॉलनी, पोस्टल कॉलनी, नवलेवाडी, आदर्श नगर, श्रीकृष्ण कॉलनी, प्रभू रामचंद्र नगर, डेराबर्डी परिसर परिसर, वामन नगर, शंभो नगर परिसरात ५० ते ६० हजार हिंदू समाज बांधवांची लोकसंख्या आहे. सद्यस्थितीत इतक्या मोठ्या लोकसंख्येला अंत्यसंस्कारासाठी घाट रोड वर, नदीला लागून असलेल्या चरण पेट्रोल पंपा समोर समोरील स्मशानभूमीत ४ ते ५ कि मी किलोमीटर दूर, रेल्वे पूल ओलांडून जावे लागत आहे.

तरी हिंदू स्मशानभूमीची जागा 33 वर्षापासून अंत्यसंस्कारासाठी जनतेसाठी खुली केलेली नाही . तसेच तशी जागा मागणी आत्तापर्यंत झालेली नव्हती. या संदर्भात संदीप लांडगे (तालुका अध्यक्ष -राष्ट्रीय बजरंग दल , आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद ) यांनी 10 मे 2023, रोजी हिंदू स्मशानभूमी साठी जागा मागणीचा अर्ज प्रांताधिकारी यांच्याकडे दाखल केला होता. आजपर्यंत या सर्व पाठपुरावाला सव्वा वर्षापेक्षा जास्त कालावधी झालेला आहे .तरी सततच्या पाठपुरावामुळे, भूसंपादन विभाग, जळगाव यांची परवानगी 17 जानेवारी 2024 रोजी प्राप्त झाली. सार्वजनिक बांधकाम विभाग यांचा अहवाल 8 फेब्रुवारी 2024 रोजी प्रांत अधिकाऱ्यांना मिळाला आहे.नगर रचना विभाग, जळगाव यांच्या विभागाचा वस्तुनिष्ठ अहवाल आणि तांत्रिक छाननी पूर्ण झालेली असून असे पत्र 13 फेब्रुवारी 2024 रोजी प्रांताधिकारी यांना प्राप्त झाले.

प्रांताधिकारी यांनी उप -अधीक्षक भूमि अभिलेख चाळीसगाव यांना 20 फेब्रुवारी 2024 रोजी एक एकर जागेची मोजणी करून दिशादर्शक मोजणी नकाशा व वस्तुनिष्ठ चौकशी अहवाल सादर करावयास सांगितले आहे. तरी या संदर्भात नगरपालिकेला जागा मोजणी अर्ज 2 मे 2024 रोजी दिलेला आहे. आजपर्यंत या प्रकरणाला ५ महिने उलटले असून, नगरपालिका याबाबतीत चाल ढकल करत आहे. अद्यापपावतो नगरपालिकेने उप -अधीक्षक भूमी अभिलेख यांना मोजणीची फी भरलेली नाही . आणि मोजणी फी भरली नसल्याकारणाने हिंदु स्मशानभूमी मंजूर होण्यासाठी विलंब होत आहे. तरी नगरपालिकेने जागा मोजणीचे चलन, त्वरित भरून कायदेशीर पूर्तता करावी. जेणेकरून हिंदू समाजाच्या लोकांचे स्मशानभूमीची जागा जनतेसाठी उपलब्ध होईल. अंत्यसंस्कारासाठी होत असलेली पायपीट थांबेल. दिनांक ०८.०६.२०२२ रोजीच्या प्रांत आदेशानुसार पश्चिमेकडील ०.४० हे आर (१ एकर) जागा हि मुस्लिम स्मशान भूमीसाठी प्रदान झालेली आहे. लोकसंख्येच्या गणिता-नुसार या परिसरात मुस्लिम समाज बांधवांची संख्या अंदाजे १५००-२००० असतांना, स्मशान भूमीसाठी जागा पारित होऊ शकते, तर मग ५० ते ६० हजार लोकसंख्या असलेला हिंदू समाजाच्या स्मशान भूमीसाठी १ एकर जागा मंजूर असतांना, जागा पारित होण्यास इतका विलंब का ? असा प्रश्न विचारत नगरपालिका मुख्याधिकारी आणि कर्मचारी जाणूनबुजून, मुस्लिम स्मशान भूमी मंजुरीसाठी तत्परता दाखवतात. आणि हिंदू लोकांच्या स्मशान भूमी मंजुरी साठी वेळ काढूपणा करत आहे. हे पक्षपातीपणाचे आहे.

या प्रकरणाची तात्काळ गंभीरतेने दखल घेऊन प्रांत अधिकाऱ्यांनी नगरपालिका आणि भूमी अभिलेख यांच्याशी समन्वय साधून मोजणी अहवाल मागवून, हिंदू स्मशानभूमी साठी १५ दिवसाच्या आत जागा प्रदान करावी. अन्यथा आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद आणि राष्ट्रीय बजरंग दल यांच्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल आणि होणाऱ्या परिणामास प्रशासन जबाबदार राहील याची नोंद घ्यावी.

निवेदनावर जळगाव जिल्हा सहमंत्री -अविनाश कुलकर्णी, जळगाव जिल्हा ग्रामीण अध्यक्ष – राहुल चौधरी, चाळीसगाव तालुका अध्यक्ष -संदीप लांडगे, चाळीसगाव शहर उपाध्यक्ष- बापूसाहेब जाधव, विजय पाटील, बबलू चौधरी, रमेश तात्या पवार, बंडू फणसे, दुर्गेश पवार, अशोक तिरमली , विनोद तिरमले आदींच्या सह्या आहेत.

 

 


 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे