महाराष्ट्रराजकीय

अखेर रुपाली पाटील यांचा अंतिम निर्णय, राष्ट्रवादीचे ‘घड्याळ’ बांधणार

 पुण्यातील मनसेच्या आक्रमक नेत्या म्हणून ओळख असलेल्या रुपाली पाटील यांनी मनसेला सोडचिठ्ठी देत जय महाराष्ट्र केला. पाटील यांनी आज पत्रकार परिषद घेऊन त्याबाबतची माहिती दिली. मनसे अध्यक्ष राज ठाकरे पुणे दौऱ्यावर येण्यापूर्वीच रुपाली पाटील यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिल्याने मनसेला हा जबर धक्का मानला जात आहे. आता रुपाली पाटील कोणत्या पक्षात प्रवेश करणार अशी चर्चा सुरु झाली होती. मात्र, आता पाटील राष्ट्रवादीचे घड्याळ बांधणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील  यांच्या उपस्थित पाटील मुंबईमध्ये राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत.

दरम्यान, राजीनामा दिल्यानंतर रूपाली पाटील यांच्यावर मनसेचे नगरसेवक वसंत मोरे यांनी बोचरी टीका केली. रूपाली पाटलांनी राजकीय आत्महत्या केली आहे. मनसेला त्यांच्या जाण्यानं काही मोठं खिंडार पडलं नाही. मनसेत रिकामटेकडे कोण हे त्यांनी एकदा जाहीर करावे. रूपाली पाटील-ठोंबरे यांना राजीनामा द्यायचाच होता. हा सगळा त्यांचा नियोजित प्लॅन आहे, असा दावा मोरे यांनी केला.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे