सुधागड तालुक्यात गाव तिथे आरोग्य दूत व त्यांचे कर्तव्य या विषयांवर मार्गदर्शन
आरोग्याच्या प्रश्नावर काम करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने दिशा केंद्र या सामाजिक व शैक्षणिक संस्थेची जिल्हा मातृ संस्था म्हणून निवड केली आहे
राहुल महाडिक, जिल्हा प्रतिनिधी.
सुधागड (प्रतिनिधी) सुधागड तालुक्यामध्ये मानवाधिकार आणि मानवविकास दिनाचे औचित्य साधून जांभूळपाडा प्राथमिक आरोग्य केंद्र व वांद्रोशी या वाडीमध्ये गाव वाडीतील आरोग्याचे प्रश्न कसे सोडविले जातील, शासनाच्या आरोग्य सेवा, संदर्भ सेवा व गाव तिथे आरोग्य दूत व त्यांचे कर्तव्य या विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले.

राष्ट्रीय आरोग्य अभियान व राज्य मातृ संस्था सोस्वा पुणे यांच्या वतीने व काम्युनिटी ऍकशन फॉर हेल्थ या कार्यक्रमातर्गत रायगड जिल्हा मध्ये आरोग्याच्या प्रश्नावर काम करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने दिशा केंद्र या सामाजिक व शैक्षणिक संस्थेची जिल्हा मातृ संस्था म्हणून निवड केली आहे, त्यामध्ये कर्जत आणि सुधागड तालुक्यातील गावांमध्ये सार्वजनिक हक्काच्या सेवा दर्जेदार व मोफत मिळाल्या पाहिजेत या साठी दिशा केंद्र ही संस्था आदिवासी विभागात काम करीत आहे, त्याच अनुषंगाने 10 डिसेंबर ला सुधागड तालुक्यामध्ये मानवाधिकार आणि मानवविकास दिनाचे औचित्य साधून जांभूळपाडा प्राथमिक आरोग्य केंद्र व वांद्रोशी या वाडीमध्ये गाव वाडीतील आरोग्याचे प्रश्न कसे सोडविले जातील, शासनाच्या आरोग्य सेवा, संदर्भ सेवा व गाव तिथे आरोग्य दूत व त्यांचे कर्तव्य या विषयांवर मार्गदर्शन झाले, या कार्यक्रमाला दिशा केंद्र या संस्थेचे सचिव व काम्युनिटी ऍकशन फॉर हेल्थ या कार्यक्रमाचे जिल्हा समन्वयक उज्जैनभाऊ शिरसाठे, सुधागड तालुका आरोग्य अधिकारी डॉ. शशिकांत मढवी सर, जांभूळपाडा प्रा. आ. केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. मुळे सर, डॉ. खिलारे मॅडम तसेच वांद्रोशी वाडीतील ग्रामस्थ व दिशा केंद्र चे प्रतिनिधी उपस्थित होते.



