पाचोरा काकन बर्डीच्या खंडेरायांचे भाविकांनी घेतले दर्शन
झूम मराठी वृत्तसेवा
पाचोरा – खान्देशातील जागृत देवस्थान म्हणून राज्यात लौकिक असलेल्या पाचोरा काकन बर्डीच्या खंडेरायांची यात्रा मोठ्या उत्साहात यात्रोत्सव झाला. यावेळी लाखो भाविकांनी नवसाला पावणाऱ्या खंडेरायांचे दर्शन घेतले.
कोरोनामुळे गेल्या वर्षी यात्रा भरली नव्हती, परंतु यावेळीही ओमायक्रॉनचा धोका पाहता काकन बर्डी मंदिर ट्रस्टने यात्रा होऊ नये म्हणून पाचोरा पोलीस स्टेशनला विनंती केली होती. आणि नंतर उलट सुलट प्रतिक्रिया येत होत्या. त्याच वेळी कांग्रेस तालुकाध्यक्ष सचिन सोमवंशी यांनी यात्रा सुरु व्हावी यासाठी विशेष पर्यन्त व जागृती केली. यात्रा बंद आहे म्हणून पाळणा खेळणी व्यवसायिक येऊन परत गेले त्यांचे आर्थिक नुकसान झाले.
भाविक हे निराश झाले होते! या वर्षी यात्रा आहे की नाही भाविक द्विधा परीस्थित होते तरीही या वर्षी यात्रोत्सव साजरा करण्याची परवानगी आहे की नाही याची खातरजमा न करता मोठया हर्षोल्हासात यात्रोत्सव साजरा झाला.
यात्रौत्सवामुळे पंचक्रोशीत उत्साह व चैतन्याचे वातावरण होते. यावेळी भाविकांनी खंडेरायाला नारळ, गूळ, आदी अर्पण करण्यात आले.
आबालवृद्धांनी घेतला आनंद कोरोमुळे सर्वत्र निर्बंध असल्याने गेल्या वर्ष-दोन वर्षांत सर्वांनीच येणे जाणे टाळले होते. परंतु, यात्रा भरणार असल्याने सर्वांनाच यात्रोत्सवाचा आनंद लुटता आला. महिला भगिनीसह, लहान मुले, युवा वर्गासह आबालवृद्ध आदींनी स्वतःच्या खासगी, तसेच मिळेल त्या खासगी प्रवासी वाहनांनी यात्रोत्सवात सहभागी झाले. उसाचा सर, भजी, जिलेबी, कुल्फी, आइस्क्रीम, आदी खाण्याचा आनंद लुटला.




