आपल खान्देश

पिंपळगाव (हरेश्वर) ते भोजे गावा दरम्यान दोन दुचाकींची समोरासमोर धडकेत दोन महाविद्यालयीन विध्यार्थी ठार!

पाचोरा : तालुक्यातील पिंपळगाव (हरेश्वर) ते भोजे गावा दरम्यान दोन दुचाकींची समोरासमोर झालेल्या धडकेत दोन महाविद्यालयीन तरूण जागीच ठार तर चार जण जखमी झाल्याची घटना १ रोजी सकाळी घडली. यात दोन्ही दुचाकींचे मोठे नुकसान झाले आहे.

याबाबत घटनेबाबत अधिक माहिती अशी की, बुधवार १ रोजी सकाळी १०:३० ते १०:४५ वाजेच्या सुमारास पिंपळगाव (हरेश्वर) ते भोजे गावा दरम्यान दुचाकी क्रमांक (एम.एच.१९/डीए/०३६९) व (एम.एच. १९१९/ १४३६) या मोटर सायकलीची समोर समोर झालेल्या धडकेत नरेंद्र भगवान गव्हाळे (२०)(रा. चिंचपुरे ता. पाचोरा) व जीवन संतोष कदम (१७) (रा.भोजे ता.पाचोरा ) हे महाविद्यालयीन तरुण जागीच ठार झाले. तर बबन तडवी (२५) व जब्बार तडवी (४५), विशाल युवराज पवार व भावेश विनोद पवार हे चार जण गंभीर जखमी झाले.


अपघाताचे वृत्त समजताच १०२ रुग्णवाहिका चालक बाजीराव गीते व दतु तुळशीराम माळी यांनी चौघांना पाचोरा ग्रामीण रुग्णालयात भरती केले असता वैद्यकीय अधिकारी डॉ अमित साळुंखे यांनी जीवन संतोष कदम (रा.भोजे ता.पाचोरा) व नरेंद्र भगवान गव्हाळे रा. चिंचपुरा ता.पाचोरा यांना मृत घोषित केले. बबन तडवी व जब्बार तडवी यांना पाचोरा येथील वृंदावन मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पिटल मध्ये तर विशाल युवराज पवार व भावेश विनोद पवार यांना विघ्नहर्ता मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले असून उपचार सुरू आहे. सदरील घटनेबाबत पाचोरा ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अमित साळुंखे यांनी पाचोरा पोलिसात खबर दिल्यावरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून चौकशी कामी पिंपळगाव (हरेश्वर) पोलिसात वर्ग करण्यात आला आहे. पुढील तपास पिंपळगाव (हरेश्वर) पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कृष्णा भोये यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे