ब्रेकिंग

नांदगावं – आशा वर्कर व गटप्रवर्तक आंदोलनाला गट विकास अधिकारीच्या आश्वासनानंतर मुक्कामी आंदोलन मागे

आशा वर्कर व गटप्रवर्तक यांनी सुरू केलेले आंदोलन गट विकास अधिकारी गणेश चौधरी यांचे आश्वासनानंतर मुक्कामी आंदोलन मागे 

 नांदगाव ( प्रतिनिधी ) मुक्ताराम बागुल – नांदगाव तालुक्यातील आशा स्वयंसेविका व आशा सुपरवायझर यांनी माणगाव पंचायत समितीच्या कार्यालयासमोर सुरू केले बिऱ्हाड मुक्कामी आंदोलन गटविकास अधिकारी गणेश चौधरी व वैद्यकीय अधिकारी संतोष जगताप यांच्या आश्वासनानंतर मागे घेण्यात आले.

  मागील काळात फ्रंड लाईन वर्कर म्हणून काम करणाऱ्या आशा वर्कर व गटप्रवर्तक यांना प्रोत्साहन भत्ता भारत सरकारने जाहीर केला होता मात्र 19 महिन्यात आज पर्यंत एक हजार रुपये सोडले. कर नंतर एक रुपयाही त्यांनी दिला नाही . याबाबत वेळोवेळी अर्ज देऊनही देऊनही प्रशासनाने दखल घेतली नसल्याने आशा वर्कर आणि गटप्रवर्तक यांनी दिनांक 25 नोव्हेंबर 2020 रोजी गुरुवारी सकाळी 11 वाजता नांदगाव पंचायत समितीच्या कार्यालयासमोर बि-हाड घेऊन मुक्कामी आंदोलनाला सुरुवात केली. त्यावेळी राज्य सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. महिलांनी घरातील सर्वच वस्तू घेऊन अनोखे आंदोलन केल्यामुळे अनेकांचे भुवया उंचावल्या होत्या.

  नांदगाव तालुक्यामधील आशा वर्कर व गटप्रवर्तक यांचे कोरोना महामारी ही प्रचंड विनाशकारी असतानासुद्धा या आजारापासून जनतेला वाचविले. व त्यासाठी अतोनात काम केले. महाराष्ट्र शासनाने मार्च दोन हजार वीस मध्ये एक जीआर काढून प्रोत्साहन भत्ता म्हणून दरमहा एक हजार रुपये कोरोना काळ संपेपर्यंत देण्याचे जाहीर केले होते. परंतु ग्रामपंचायत व ग्रामसेवक यांनी फक्त एप्रिल दोन हजार वीस मध्ये एकदा हजार रुपये दिले होते त्यानंतर पैसे दिलेच नाही. वारंवार पत्रव्यवहार करूनही पैसे मिळाली नाही. शेवटी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिनांक 17/06/2021 रोजी सर्व पंचायत समिती चे गट विकास अधिकारी यांना पत्र काढले. आशा व गटप्रवर्तक यांना पैसे देण्यात यावे असे त्या पत्रात म्हटले होते. परंतु त्यानंतरही पैसे मिळाले नाही. त्यामुळे संतप्त आशा वर्कर व गटप्रवर्तक यांनी नांदगाव पंचायत समिती कार्यालयासमोरील आवारात मुक्कामी आंदोलनाला सुरुवात केली आंदोलनामध्ये शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली व तोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आमचे मुक्कामी आंदोलन सुरूच राहील अशा घोषणा आशा वर्कर व गटप्रवर्तक यांनी दिल्या.

  कोरोना काळ असो वा गावातील जनगणना किंवा कोणत्याही प्रकारचा सर्वे यासाठी सर्वात आधी काम करण्यासाठी आठवण होते ती आशा वर्कर ची ग्रामीण भागातील आशा वर्कर यांचे काम युद्ध पातळी

 वरील आहे. खेडोपाडी मयत राहणाऱ्या सर्व नागरिकांची सर्वच माहिती या गोळा करतात तेही अल्पशा मानधनात तसेच अनेकदा सर्वे किंवा कोरोना सारखे काम करून देशील मंजूर केलेले पैसे देखील पुन्हा दिले जात नाही. त्यामुळे कामात अव्वल असणाऱ्या आशा वर्कर या नेहमी उपेक्षितच असतात  यामुळे शासनाने त्यांच्या अडचणी समजून त्यांना वेळोवेळी मदत करावी.

यासाठी दिनांक 25 नोव्हेंबर 2021 रोजी गुरुवारी सकाळी ठिक अकरा वाजता आशा वर्कर व गटप्रवर्तक नांदगाव पंचायत समिती कार्यालयासमोर मुक्कामी आंदोलन सुरू केले. हे आंदोलन भर उन्हात दुपारी दोन वाजेपर्यंत करण्यात आले. या आंदोलनाची त्वरित दखल घेऊन नांदगाव पंचायत समितीचे गट विकास अधिकारी गणेश चौधरी व तालुका वैद्यकीय अधिकारी संतोष जगताप यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन प्रोत्साहन भत्ता देणेबाबत चे पत्र ग्रामसेवक यांना देण्यात आल्याचे सांगितले. 15 डिसेंबर जून 2020 ते नोव्हेंबर 2021 पर्यंत चे पैसे देण्यात येतील तसेच मे 2020 ते मी 2021 पर्यंत पैसे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडील मार्गदर्शन मागून याबाबत निर्णय घेण्यात येईल काशी आसुसून नांदगाव पंचायत समितीचे गट विकास अधिकारी गणेश चौधरी व तालुका वैद्यकीय अधिकारी संतोष जगताप यांनी आश्वासन दिले. या आश्वासनानंतर आशा वर्कर व गटप्रवर्तक यांनी सुरू केलेले मुक्कामी आंदोलन मागे घेण्यात आले.

   या आंदोलनाचे नेतृत्व आशा व गटप्रवर्तक संघटनेचे जिल्हा संघटक कॉम्रेड विजय दराडे यांनी केले होते. या आंदोलनात दिपाली कदम, चित्रा तांबोळी, शारदा निकम, इंदुमती गायकवाड, चित्र आहेर, रोहिणी आहेर, मनीषा पाचरे, योगिता देवकर, लता लाठे, छाया सोनवणे, दीपा सानप, संगीता सोनवणे, भारती अण्णासाहेब बागुल यासह नांदगाव तालुक्यातील सर्व आशा वर्कर व गट प्रवर्तक उपस्थित. होत्या.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे