खुनाच्या गुन्ह्यातील जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला 19 वर्षापासून फरार बंदी कैदीस स्थानिक गुन्हे शाखेकडून अटक..
- झूम मराठी ऑनलाईन
खुनाच्या गुन्ह्यातील जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला आरोपी गोकुळ रावण वाघ, सन २००६ मध्ये शिक्षा रजेवर गावी आला होता. त्यानंतर तो पुन्हा रजा संपल्या नंतर शिक्षा भोगण्या करीता कारागृहात हजर झालेला नव्हता तब्बल 19 वर्षांनी धुळ्यातुन त्याच्या मुसक्या आवळून मध्यवर्ती कारागृह नाशिक येथे जमा करण्यात आले आहे.
सविस्तर वृत्त असेकी, धुळे तालुका पोलीस स्टेशनचे खुनाचे गुन्ह्यातील शिक्षा बंदी कैदी ८ ५६०९ गोकुळ रावण वाघ, रा.शासकिय दुधडेअरी मागे धुळे याने पोहरे ता. चाळीसगाव येथील त्याचे नातेवाईकांस जामीनदास म्हणुन नमुद करून सन २००६ मध्ये शिक्षा रजेवर गावी आला होता. त्यानंतर तो पुन्हा रजा संपल्या नंतर शिक्षा भोगण्या करीता कारागृहात हजर झालेला नव्हता. त्यावरून मेहुणबारे पो.स्टे. भाग ५ गुरनं ३०१५/२०१४ भादवि कलम २२४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्हा दाखल झाल्या नंतर बरेच दिवसापासून शिक्षा बंदी कैदी ८ ५६०९ गोकुळ रावण वाघ, रा.शासकिय दुधडेअरी मागे धुळे याचा वेळोवेळी शोध घेत असतांना देखील तो मिळून येत नव्हता. त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे पथकास शिक्षा बंदी कैदी ८ ५६०९ गोकुळ रावण वाघ, रा.शासकिय दुधडेअरी मागे धुळे हा त्याची ओळख लपवून पुणे येथे राहत असल्याची बातमी मिळाली होती. त्यावरून सदर पथकाने त्याची खात्री करणे बाबत गोपनीय बातमीदारास कळविले असता, गोपनीय बातमीदारा मार्फत खात्रीशीर बातमी मिळाली की, शिक्षा बंदी कैदी ८ ५६०९ गोकुळ रावण वाघ, रा.शासकिय दुधडेअरी मागे धुळे हा धुळे येथील रेल्वे स्टेशन परिसरात येणार असल्याची बातमी मिळाली. त्यावरून सदर पथकाने धुळे येथे जावून मिळालेल्या बातमीची खात्री करून शिक्षा बंदी कैदी ८ ५६०९ गोकुळ रावण वाघ, रा.शासकिय दुधडेअरी मागे धुळे यास ताब्यात घेवून त्यास मेहुणबारे पो.स्टे. भाग ५ गुरनं ३०१५/२०१४ भादवि कलम २२४ या गुन्ह्याचे पुढील तपासकामी मेहुणबारे पो.स्टे.चे ताब्यात देण्यात आले आहे. त्यावरून मेहुणबारे पो.स्टे. यांनी शिक्षा बंदी कैदी ८ ५६०९ गोकुळ रावण वाघ, रा.शासकिय दुधडेअरी मागे धुळे यास पुढील जन्मठेपेची शिक्षा भोगणे कामी मध्यवर्ती कारागृह नाशिक येथे जमा करण्यात आले आहे.
सदरची कारवाई पोउपनिरी श्री शेखर डोमाळे, सफौ विजयसिंग पाटील, पोह सुधाकर अंभारे, लक्ष्मण पाटील, राहुल पाटील, दिपक चौधरी सर्व नेमणुक स्थानिक गुन्हे शाखा, जळगाव यांनी केली आहे.
सदरची कारवाई ही मा. डॉ.श्री. महेश्वर रेड्डी पोलीस अधीक्षक जळगाव, मा.श्रीमती कविता नेरकर, अपर पोलीस अधीक्षक चाळीसगाव, मा. श्री बबन आव्हाड वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा जळगाव यांच्या मार्गदर्शनाखाली सदरची कारवाई पोउपनिरी श्री शेखर डोमाळे, स.फौ. विजयसिंह पाटील, पोहे कॉ. सुधाकर आंबोरे, लक्ष्मण पाटील, राहुल पाटील, दीपक चौधरी सर्व नेमणूक स्थानिक गुन्हे शाखा जळगाव..



