पतीच्या निधनाचा धक्का, पत्नीनेही सोडले प्राण, एकाच सरणावर दोघांवर अंत्यसंस्कार, साऱ्या गावाच्या डोळ्यात पाणी
- दिलीप जय परदेशी @ झूम मराठी
पती-पत्नीचं नातं हे संसाराच्या दोन चाका प्रमाणे असतं. शेवटपर्यंत ते एकमेकांना साथ देत असतात. अशा अनेक घटना आपण पाहतो, पण एक मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. पतीच्या अकाली निधनाने धक्का बसलेल्या पत्नीचा देखील त्याच दिवशी मृत्यू झाला आहे. डोळ्यात पाणी आणणारी घटना घडली असून घटनेनंतर पती-पत्नीच्या पार्थिवावर एकाच सरणावर आणि एकाच वेळी अंत्यविधी करण्यात आला आहे. दगा शंकर बकले (73) व सुभद्रा बकले (68)असं मयत दाम्पत्याचे नाव असून ह्या हृदयद्रावक घटनेमुळे या कुटूंबावर दुःखाचा डोंगर कोसडला आहे.
संभाजी नगर जिल्ह्यातील नागद बनोटी या रोडावर डोंगर पायथ्या लगत मोहलाई येथील शेतकरी दगा शंकर बकले व सुभद्रा दगा बकले हे दांपत्य 50 वर्षांपासून शेती करून आपला उदर निर्वाह करीत होते, कल्याण येथे मुलाकडे काही कामासाठी सुभद्रा बकले ह्या आल्या होत्या आणि आज शुक्रवारी सकाळी आपल्या मोहलाई शिवरातील शेतात दगा शंकर बकले यांना झोपेतच मृत्यूने गाठले, असा निरोप कल्याण मुलाकडे देण्यात आला, आणि कल्याण येथून मुलगा, सून आणि सुभद्राबाई आपल्या गावाकडे अश्रू नयनानी निघाल्या वाटेत त्यांना दुःख अनावर झाले आणि त्यांनीही वाटेतच आपला प्राण सोडला त्याचा मृतदेह मोहलाई गावात रुग्णवाहिकेने आणण्यात आला पती पत्नी या दोघांची अंतयात्रा निघाली त्यावेळी दोघांवर एकाच सरणावर अंत्यसंस्कार करण्यात आला यावेळी गावातील मोहलाई गावात हळहळ व्यक्त होत आहे.
या दाम्पत्याला दोन मुले आणि एक मुलगी आणि नातवंडे, एक सुन असा परिवार आहे. एकाच दिवशी पती-पत्नीचा असा दुर्दैवी मृत्यू झाल्याची ही पहिलीच वेळ असल्याने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.



