मराठवाडा
स्त्रियांवरील वाढतेअत्याचार विषयी राष्ट्रवादी महीला आघाडीचे निवेदन
स्त्रियांवरील वाढतेअत्याचार विषयी राष्ट्रवादी महीला आघाडीचे निवेदन देण्यात आले
अंबाजोगाई(प्रतिनीधी मुक्ताराम बागुल) अंबाजोगाई येथे अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार झाला आहे. त्या संदर्भात शहर पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक पवार साहेब याना निवेदन देण्यात आले.
गेले आडीच वर्षापासून अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणारे नराधमाना लवकर चौकशी करून त्यांना कठोर शासन व्हावे. पोलिसांनी जे जेआरोपी असतील त्यांचा शोध घ्यावा व त्यांना सक्त अशी शिक्षः व्हावी याकरिता जिल्हा अध्यक्ष संगीता तूपसगर यांच्या मार्गदर्शनाने आंबेजोगाई महिला आघाडीच्या अध्यक्षा अंजली पाटील यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देण्यात आले, या वेळेस संजीवनी देशमुख, नंदिनी सानप ,प्रेमलता तीगोटे,मनीषा मुंडे,सुषमा शरमा ,वनमला बनाळे रेणुका लोहार, दुर्गा शिंदे इत्यादी महिला उपस्थित होत्या.
यावेळेस अंजली ताई बोलताना म्हणाल्या की एवढे कडक कायदे होऊन सुद्धा असले अत्याचार होतात ही अतिशय निंदनीय व समाजात काळींमा फासणारी बाब आहे,असे जर घडत राहिलं तर विश्वास तरी कोणावर ठेऊन जगायचं हा मोठा प्रश्न हे ऐकणाऱ्या लोकांना पडत आहे..l
यासाठी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा आदरणीय रुपाली ताई चाकणकर आज महीलासाठी अहोरात्र झटत असतात त्यांच्या या धडपडीमुळे समाजात नक्की वचक बसेल याबद्दल तीळ मात्र शंका नाही , पण इथून मागच्या ज्या अश्या घटना घडत आल्या आहेत त्यांस कुठेतरी वाचा फोडल्या पाहिजेत ,याकरिता अशा प्रकारास मुली व महिला बळी पडू नये म्हणून पोलीस पथका कडून गस्त पथके वाढवणे गरजेचे आहे याकरिता निवेदन देण्यात आले.

