ब्रेकिंग
!नांदेड : आंध्रप्रदेशातून आलेला 11 क्विंटल गांजा जप्त, मुंबईतील NCB पथकाची कारवाई
नांदेड – आंध्रप्रदेश राज्यातील विशाखापट्टणम येथून 11 क्विंटल गांजा घेऊन नांदेडमार्गे जळगावकडे वाहतूक करणार्या ट्रकला जिल्ह्यातील मांजरम येथे एनसीबीच्या पथकाने पकडले असून ट्रकसह 2 आरोपींना ताब्यात घेतले आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर गांजा पकडण्याची ही जिल्ह्यातील पहिलीच घटना आहे. या गांजाची किंमत काळ्या बाजारात 11 कोटी रूपयांपेक्षा अधिक असल्याचे सांगितले जाते..
Maharashtra: Mumbai NCB team seized 1500 kgs of Ganja near Erandol in Jalgaon district; two people apprehended for questioning. The Ganja was being brought from Visakhapatnam, Andhra Pradesh. pic.twitter.com/JagGQpMiXP
— ANI (@ANI) November 15, 2021
मुंबई येथील नार्कोटेक्स कंट्रोल ब्युरोचे प्रमुख समीर वानखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली पाच अधिकार्यांचे पथक या ट्रकच्या मागावर होते. पोलीस निरीक्षक सुधाकर शिंदे, अमोल मोरे, संजय गवळी, प्रमोद मोरे आणि कृष्णा पारमदरेकर यांचा पथकात समावेश होता. या पथकाला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे विशाखापट्टणमहून 11 क्विंटल 27 किलो गांजा 43 पोत्यांमध्ये भरून एम.एच.26.एडी.2165 या नांदेड पासिंगच्या ट्रकमधून जळगावकडे जात असल्याचे कळाले.
संघटित अंमली पदार्थांची तस्करी करणार्यांना शोधून काढण्यात हा विभाग माहीर आहे.मुंबई येथील नार्कोटेक्स कंट्रोल ब्युरोचे प्रमुख समीर वानखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली पाच अधिकार्यांचे पथक या ट्रकच्या मागावर होते. पोलीस निरीक्षक सुधाकर शिंदे, अमोल मोरे, संजय गवळी, प्रमोद मोरे आणि कृष्णा पारमदरेकर यांचा पथकात समावेश होता. या पथकाला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे विशाखापट्टणमहून 11 क्विंटल 27 किलो गांजा 43 पोत्यांमध्ये भरून एम.एच.26.एडी.2165 या नांदेड पासिंगच्या ट्रकमधून जळगावकडे जात असल्याचे कळाले. संघटित अंमली पदार्थांची तस्करी करणार्यांना शोधून काढण्यात हा विभाग माहीर आहे.




