ब्रेकिंग
रोहिले येथील सविधान आर्मीच्या शेतीचे उद्घाटन सविधान आर्मी चे संस्थापक जगन भाई सोनवणे यांच्या हस्ते करण्यात आले.
रोहिले बु बुद्रुक येथील सविधान आर्मीच्या शेतीचे उद्घाटन सविधान आर्मी चे संस्थापक जगन भाई सोनवणे यांच्या हस्ते करण्यात आले.
नांदगाव (प्रतिनिधी) – मुक्ताराम बागुल – नांदगाव तालुक्यातील रोहिले बुद्रुक गावात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ सविधान आर्मी चे नामफलकाचे शाखेचे उदघाटन सविधान आर्मी चे संस्थापक अध्यक्ष महाराष्ट्राची बुलंद तोफ जगन भाई सोनवणे यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले.

सविधान आर्मी चे नाशिक जिल्हाध्यक्ष मुक्ताराम बागुल व ग्रामपंचायत सदस्य सुनंदा बागुल यांचा सत्कार सविधान आर्मी चे संस्थापक अध्यक्ष जगन भाई सोनवणे यांच्या हस्ते करण्यात आले
येथील गावात सविधान आर्मीच्या शाखेच्या नामफलकाचे उद्घाटनाच्या निमित्ताने सर्वप्रथम येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती स्मारक कार्यक्रमाच्या प्रसंगी सविधान आर्मी राष्ट्रीय चिन्ह रक्षक सैनिक माननीय जगन भाई सोनवणे यांनी पुष्पहार अर्पण करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवास अभिवादन केले व संपूर्ण गावातून विशाल रॅली काढण्यात आली व संविधान निर्माते परमपूज्य डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकापर्यंत सदरची रॅली काढण्यात आली होती.

संपूर्ण गावातून काढण्यात आलेल्या तालीम मध्ये मोठ्या प्रमाणावर तरुणांची व महिलांची प्रचंड उपस्थिती होती या रॅली मधील सर्व संविधान रक्षक सैनिक यांच्या हातात निळा ध्वज आणि तिरंगा ध्वज होते. तसेच एका हातात तिरंगा व एखादा संविधानाची प्रत सर्व जनतेचे लक्ष वेधून घेत होते. विशेष म्हणजे संविधान निर्माते परमपूज्य डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटोही लहान मुलाच्या हातात होता..
रॅलीमध्ये सविधान रक्षकांनी गगनभेदी घोषणांनी गावातील संपूर्ण परिसर आनंद सोडला होता. या गोष्टींमध्ये विजन आर्मी की क्या पहचान! एक हात मे तिरंगा और एक हात मे सविधान, सविधान आर्मी आई है! नही रोशनी लाई है. तसेच संविधानाचा विजय असो या संविधानामय वातावरण निर्माण झाले होते.
कोण आया है कौन आया! संविधान रक्षक सैनिक जगन भाई सोनवणे आया अशा वेगवेगळ्या घोषणांनी व परिसर दणाणून सोडला होता.

यानंतर डॉक्टर बाबासाहेब पुतळा जवळ सभेला सुरुवात कधी झाली. सभेला सुरुवात करण्यापूर्वी प्रथम सविधान आर्मी तर्फे संविधान पुस्तिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले. त्यानंतर सभेला सुरुवात झालेल्या संबोधन करताना सविधान आर्मी चे चीफ महाराष्ट्राची मुलुख मैदानी तोफ जगन भाई सोनवणे आपल्या भाषणात म्हणाले की आम्ही सविधान आर्मी ची व संविधान वादी तोरणांची लाट कुणीही थांबू शकत नाही. सविधान आर्मी के वास्ते! खाली कर दो रास्ते. अशा पद्धतीने वातावरण निर्मिती संपूर्ण महाराष्ट्रात झाली आहे असे त्यांनी भाषणात बोलताना सांगितले.
तसेच सविधान आर्मी चे संस्थापक अध्यक्ष जगन भाई सोनवणे यांचा सत्कार गावातील जेष्ठ कार्यकर्ते रतन बागुल यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला तसेच आलेल्या पाहुण्यांचे ही सत्कार करण्यात आले.
सविधान आर्मीच्या शाखेच्या नाम फलकाच्या उदघाटन निमित्ताने सविधान आर्मी चे नाशिक जिल्हाध्यक्ष मुक्ताराम बागुल, नांदगाव तालुका अध्यक्ष करिष्मा साळवे, नांदगाव तालुका उपाध्यक्ष प्रवीण भाऊ बागुल, जातेगाव गणा प्रमुख अनिल बागुल तसेच सविधान आर्मीच्या महिला आघाडीच्या नाशिक जिल्हाध्यक्ष संगिता बागुल तर गावातील सविधान आर्मी चे शाखाध्यक्ष रवींद्र यादव बागुल उपाध्यक्ष सुभाष बाजीराव बागुल, सचिव विशाल अशोक बागुल व इतर कार्यकर्ते पदाधिकारी आणि सामाजिक कार्यकर्ते रवींद्र रतन बागुल आदी उपस्थित होते.




