लोहारा विद्यालय प्रजासत्ताक दिन साजरा
लोहारा शहापुरा (प्रतिनिधी दिलीप राजपुत)
धी शेंदुर्णी सेकंडरी एज्युकेशन को-ऑपरेटिव सोसायटी द्वारा संचलित डॉक्टर जे जी पंडित माध्यमिक विद्यालय लोहारा येथे देशाचा 75 वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला याप्रसंगी विद्यालयाचे चतुर्थ श्रेणी कर्मचारी आनंदा जानकीराम पाटील यांच्या हस्ते विद्यालयात ध्वजारोहण करून मानवंदना देण्यात आली तसेच स्काऊट गाईडचे ध्वजारोहण सुद्धा गाईड विद्यार्थिनीच्या हस्ते करण्यात आले तर प्रमुख पाहुणे म्हणून नवनिर्वाचित स्थानिक सल्लागार समिती अध्यक्ष कृषिभूषण विश्वासराव आनंदराव पाटील स्थानिक सल्लागार समिती सदस्य डॉक्टर देवेंद्र शेळके उत्तम भाऊ शेळके दिगंबर दादा चौधरी उपस्थित होते तसेच सोसायटीचे चेअरमन सुनील भाऊ क्षीरसागर पत्रकार चंद्रकांत भाऊ पाटील नंदू भाऊ सुर्वे महेंद्र घोंगडे भूषण भाऊ शिवदे हे सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते यानंतर स्काऊट गाईडचे पथसंंचालन करण्यात आले भारतीय कवायत विद्यार्थ्यांनी सादर केली विद्यार्थ्यांनी पारंपारिक वेशभूषेतील वारकरी संप्रदायातील भक्ती गीत सादर केले याप्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक एस टी चिंचोले सर उपमुख्यद्यापिका यु डी शेळके मॅडम सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व्ही एम शिरपुरे सर यांनी केले यावेळेस विद्यार्थी सुद्धा मोठ्या संख्येने प्रजासत्ताक दिनासाठी उपस्थित होते



