गुन्हेगारी

धक्कादायक – अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिच्यावर वेळोवेळी बलात्कार करून तिला गर्भवती होण्यास भाग पाडले!

चाळीसगाव (प्रतिनिधी) मामाच्या गावी शिक्षणासाठी आलेल्या 13 वर्षीय तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिच्यावर वेळोवेळी बलात्कार करून तिला गर्भवती होण्यास भाग पाडल्याचा धक्कादायक प्रकार चाळीसगाव तालुक्यात उघडकीस आला आहे.

या प्रकरणी संशयित तरुणाच्या विरोधात मेहुणबारे पोलीस ठाण्यात याबाबत सविस्तर वृत्त असे की, पर जिल्ह्यातील 13 वर्षीय मुलगी चाळीसगाव तालुक्यात एका गावात आपल्या मामाकडे शिक्षणासाठी आली होती. नववीच्या वर्गात ती शिक्षण घेत असतानाच तिची ओळख तिच्या चुलत मामाच्या मुलाशी झाली. त्यानंतर या दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले. पीडित बालिका मामाच्या घरात एकटी असताना संशयित तरुण तिच्या घरात घुसून व तिला तुझ्यावर माझे प्रेम आहे असे सांगितले. त्यानंतर संशयित आरोपीने पीडित बालिकेशी प्रेमसंबंध निर्माण करून वेळोवेळी तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले. त्यानंतर काही दिवसांनी पीडित बालिका आपल्या आई-वडिलांकडे गेली असता काही महिन्यानंतर मासिक पाळी येत नसल्याने तिने आपल्या आईला सांगितले दरम्यान आई तिला डॉक्टरांकडे घेऊन गेल्यानंतर डॉक्टरांनी तिला गर्भवती असल्याचे सांगितले.गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

त्यानंतर आईने तिला विश्वासात घेऊन तिच्या कडून सर्व विचारणा केल्यानंतर संबंधित पीडित बालिकेने घडलेली सर्व आपबिती आईला सांगितली. त्यानंतर पीडित बालिका व आईने लोणी पोलीस ठाण्यात धाव घेतली. पीडित बालिकेच्या फिर्यादीवरून तरुणाच्या विरोधात भादंवि कलम 376, 376(2), (एन), पोस्को कायदा 2012 चे कलम 4 अन्वये लोणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तेथून तो पोलिस अधीक्षकांच्या लेखी आदेशानंतर मेहुणबारे पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक प्रकाश चव्हाणके हे करीत आहेत.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे