आपल खान्देशक्रिडा व मनोरंजनमहाराष्ट्र

Lohara News | लोहारा विद्यालयात नमो चषकानिमित्त विविध स्पर्धांचे आयोजन


लोहारा वृत्त (प्रतिनिधी – दिलीप राजपूत) धी शेंदुर्णी सेकंडरी एज्युकेशन को-ऑपरेटिव्ह सोसायटी द्वारा संचलित डॉ जे जी पंडित माध्यमिक विद्यालय लोहारा येथे नमो चषकानिमित्त लोहारा विद्यालयात विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आलेले होते यात मॅरेथॉन या स्पर्धेचे उद्घाटन तरुण तडफदार युवा नेते भैय्यासाहेब स्नेहदिप संजयराव गरुड, कैलास आप्पा चौधरी स्थानिक सल्लागार समितीचे अध्यक्ष कृषिभूषण विश्वासराव आनंदराव पाटील यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून करण्यात आले मुला मुलींची स्वतंत्रपणे मॅरेथॉन स्पर्धा घेण्यात आली यावेळी स्थानिक सल्लागार समितीचे उपाध्यक्ष अ अ पटेल सर स्थानिक सल्लागार समितीचे सदस्य सुरेश गडबड चौधरी उत्तमराव वेडूजी शेळके डॉ देवेंद्र भीमराव शेळके शिवराम रामचंद्र भडके वरिष्ठ पत्रकार महेंद्र आप्पा शेळके विकास भाऊ देशमुख राहुल कटारिया संजय पांडुरंग पाटील शरद देशमुख सर पी व्ही जोशी सर यावेळी पंचक्रोशीतील अनेक मान्यवर मंडळी उपस्थित होते विद्यालयाचे मुख्याध्यापक एस टी चिंचोले सर उपमुख्याध्यापिका यु डी शेळके मॅडम पर्यवेक्षक पी एम सुर्वे सर यावेळी उपस्थित होते यानंतर विद्यार्थ्यांच्या चित्रकला व रांगोळी तसेच विविध क्रीडा स्पर्धा घेण्यात आल्या अनेक विद्यार्थ्यांनी या विविध स्पर्धांमध्ये सहभाग नोंदवला यासाठी विद्यालयाचे वरिष्ठ शिक्षक आर जी बैरागी सर आर सी जाधव सर पी यू खरे सर एच डी पाटील पी ए सोनार सर सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

 

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे