आपल खान्देश

एस टी महामंडळाचा चेअरमन न ठेवता सरळ परिवहनमंत्री असावा,अशी मागणी खासदार आमदारांना ‘महाराष्ट्र जागृत जनमंच’ने केली

जिल्ह्यातील सर्व आमदार खासदार यांनी मुख्यमंत्री व राज्यपाल यांना पत्र देऊन मंत्रीमंडळाने तसा निर्णय घ्यावा.विधानसभा अधिवेशनात ठराव पारीत करावा.अशी मागणी महाराष्ट्र जागृत जनमंचचे शिवराम पाटील व ईश्वर मोरे यांनी केली.

एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचे जळगाव येथे आंदोलन चालू आहे.जळगाव एसटी आगारात मोठ्या संख्येने कर्मचारी काम बंद आंदोलन करीत आहेत.

त्यांची प्रमुख मागणी आहे कि,एसटी महामंडळाला राज्यातील खात्याचा दर्जा द्यावा.महामंडळ ऐवजी राज्य सरकार मधे खाते बनवले पाहिजे. महामंडळ व चेयरमन न ठेवता सरळ परिवहनमंत्री असावा.
त्यामुळे राज्य सरकारी कर्मचारी प्रमाणेच एसटी कामगारांना वेतन मिळेल.पुन्हा पुन्हा आंदोलन करायची गरज नाही.
अशी आमची मागणी आहे.जळगाव जिल्ह्यातील आमदार आणि खासदार यांनी तसे पत्र मुख्यमंत्री व राज्यपाल यांना द्यावे.जिल्ह्यातील प्रमुख नेत्यांनी मंत्री गुलाबराव पाटील,आमदार गिरीश महाजन आमदार शिरीष चौधरी,आमदार सुरेश भोळे,आमदार अनिल देशमुख, आमदार चिमणराव पाटील यांनी मुख्यमंत्री व राज्यपाल यांना पत्र देऊन मंत्रीमंडळाने तसा निर्णय घ्यावा.विधानसभा अधिवेशनात ठराव पारीत करावा.अशी मागणी महाराष्ट्र जागृत जनमंचचे शिवराम पाटील व ईश्वर मोरे यांनी केली.सोबत राकेश वाघ,शेतकरी संघटनेचे सुनिल पाटील होते.
या प्रस्तावाला कर्मचारी बांधवांनी उस्फुर्त प्रतिसाद दिला.
एसटी महामंडळ हे फक्त सरकार ची अमानत नसून जनतेचा त्यात सहभाग आहे.म्हणून आम्ही समर्थन देत आहोत महाराष्ट्र जागृत जनमंच शिवराम पाटील यांनी सांगितले.

महाराष्ट्र जागृत जनमंच.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे