आपल खान्देश
मेहुणबारे येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या मुर्तीची दैदीप्यमान प्राणप्रतिष्ठान सोहळा संपन्न
राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या मुर्तीची दैदीप्यमान प्राणप्रतिष्ठान सोहळा संपन्न
मेहुणबारे (प्रतिनिधी-चाळीसगाव) मेहुणबारे येथे राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या मुर्तीची प्राणप्रतिष्ठा भव्य सोहळ्यातसपन्न झाला, भव्य मिरवणूक,किर्तन, होमहवन आणि समाज भुषण पुरस्कार वितरण समारंभ अधी कार्यक्रम करण्यात आले.

मेहुणबारे येथे राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या मुर्तीची प्राणप्रतिष्ठा भव्य सोहळ्यातसपन्न झाला, यावेळी जिल्हाचे पालक मंत्री मा.ना.गुलाबराव पाटील, आमदार मंगेश चव्हाण , आमदार किशोर आप्पा पाटील, मारुती काळे, महासचिव योगेश परदेशी,जिल्हा अध्यक्ष देवचंद साबळे , शितलताई चिंचोरे, शिवसेना तालुका प्रमुख खलाणे साहेब यांच्या सह समाजातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. या सोहळ्यात धनगर समाज संघर्ष समितीचे प्रदेश अध्यक्ष मा.बापुसाहेब शिंदे, ठाणे जिल्हा व उत्तर महाराष्ट्र धनगर महासंघाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर परदेशी अधींसह काही मान्यवराना समाजभुषण पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले. सदर भव्य कार्यक्रम मा.संजयभाऊ गढरी संघटक उत्तर महाराष्ट्र धनगर महासंघ व मेहुणबारे येथील सर्व समाज बांधव व ग्रामस्थ यांच्यावतीने आयोजित करण्यात आले होते, समाजभुषण पुरस्कार मिळ्याला बददल सर्व मान्यवरांचे हार्दीक अभिनंदन.





