आपल खान्देश

वृक्षारोपणानंतर २४० रोपांच्या संगोपनासाठी ठिबक सिंचनाची व्यवस्था; काकनबर्डी येथे सामाजिक संस्थांचा पुढाकार..

वृक्षांना ठिबक सिंचनाची व्यवस्था या विचाराला प्रत्यक्ष कृतीची जोड देणारा उपक्रम ठरला

 

पाचोरा : १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून काकनबर्डी येथील प्रसिद्ध देवस्थान खंडेराव महाराज मंदिर परिसरात करण्यात आलेल्या वृक्षारोपणानंतर आता या रोपांच्या संगोपनासाठीही ठोस पाऊल उचलण्यात आले आहे.

लावलेल्या वृक्षांना नियमित पाणी मिळावे यासाठी पाइपलाइन टाकून जवळपास २४० रोपांपर्यंत ठिबक सिंचनाच्या माध्यमातून पाणी पोहोचविण्याची व्यवस्था करण्यात आली. त्यामुळे केवळ वृक्षारोपण न करता त्यांचे संगोपन करण्याचा आदर्श उपक्रम राबविण्यात आला आहे.

पाचोरा तालुक्यातील प्रसिद्ध काकनबर्डी खंडेराव महाराज मंदिर परिसर अधिक हिरवाईने नटावा आणि लावलेली रोपे भविष्यात मोठी वृक्ष बनावीत, या उद्देशाने क्षत्रिय ग्रुप, अरमान फाउंडेशन, एम. के. अ‍ॅग्रो प्रायव्हेट लिमिटेड, नाशिक ग्रीन अर्थ फाउंडेशन, नंदकिशोर पाटील इलेक्ट्रिकल्स, खेडगाव गोतावळा ग्रुप, शारदाई गोविंद समर्थ खेडगाव, ओझर ग्रामपंचायत तसेच ओझर व अंतुर्ली विकास सोसायटी यांच्या संयुक्त सहभागातून हा उपक्रम राबविण्यात आला.

वृक्षारोपण करणे जितके महत्त्वाचे आहे, तितकेच लावलेल्या रोपांचे संगोपन करणेही गरजेचे आहे. हीच बाब लक्षात घेऊन ठिबक सिंचनाची व्यवस्था करण्यात आल्याने या रोपांना नियमित पाणी मिळणार असून, त्यांचे जगण्याचे प्रमाण वाढण्यास मोठी मदत होणार आहे.

या उपक्रमासाठी खलील दादा देशमुख, पप्पू राजपूत, गणेश पाटील (सभापती, मार्केट कमिटी), नंदू पाटील (बालाजी ग्रुप), सतीश बाप्पू शिंदे, फहिम शेख, संजय पाटील, शैलेंद्र पाटील, मंगेश सोमवंशी, स्वप्नील राजपूत, नंदकिशोर पाटील, परमेश्वर पाटील, सुधाकर पाटील, अजाबराव पाटील, भरत पाटील, भगवान पाटील, शांताराम पाटील, पप्पू जाधव, संदीप शाहापुरे, किशोर पुराणिक, संजय कानडे, अमोल जाधव, सुधीर वारुळे, सुकदेव सोनवणे, सरफराज पिजारी, हेमराज पाटील, विजय पाटील, बंडू ढमाले, रविंद्र मोरे, ज्ञानेश्वर पाटील, नितीन पाटील, अनिल परदेशी, सतीश परदेशी, अ‍ॅड. नवीन गुजर ह्यांनी मोलाची कामगिरी केली.

वृक्षारोपण करून फोटो काढण्यापेक्षा, लावलेल्या प्रत्येक रोपाची काळजी घेऊन त्याला मोठे करणे हाच खरा पर्यावरण संवर्धनाचा संदेश आहे. काकनबर्डी येथे राबविण्यात आलेली ठिबक सिंचनाची व्यवस्था या विचाराला प्रत्यक्ष कृतीची जोड देणारा उपक्रम ठरला आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Zoom Team

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे