आपल खान्देश

पाचोरा गुर्जर समाजाच्या वतीने सरदार वल्लभभाई पटेल जयंती होणार साजरी

पाचोरा गुर्जर समाजाच्या वतीने सरदार वल्लभभाई पटेल जयंती होणार साजरी.

सरदार वल्लभभाई पटेल जयंती संपूर्ण देशात उत्साहात साजरी केली जाते. यानिमित्त येणाऱ्या दि. ३१ आॅक्टोबर रोजी पाचोरा येथील सुप्रसिध्द ध्येय कॅरिअर अॅकेडमीतर्फे पाचोरा तालुक्यासह परिसरातील सर्व गुर्जर समाज आणि तत्सम पोटजाती मधील बांधवांना दि. ३१ ऑक्टोबर रविवार रोजी सकाळी १० वाजता सरदार वल्लभभाई पटेल जयंती निमित्त ध्येय करिअर अँकेडमी, गणेश कॉलनी पाचोरा जि. जळगाव येथे गुर्जर व त्या मधील सर्व पोट जाती समाजातील बंधु – भगिनींनी सदर कार्यक्रमास उपस्थीत राहावे. तसेच गुर्जर समाजातील विद्यार्थी – विद्यार्थीनी व युवक – युवतींना मनोगत व्यक्त करायचे असेल त्यांनी तयारी सह कार्यक्रमास उपस्थीती द्यावी. विशेष – मनोगत व्यक्त करणाऱ्या सर्व वक्त्यांना प्रोत्साहन पर बक्षिसे देण्यात येतील असे आवाहन प्रकल्प प्रमुख संदीप महाजन यांनी केले आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Zoom Team

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे