राज्यात अनेक धक्कादायक घटना उघडकीस येत असताना अशीच एक घटना वर्धा इथे उघडकीस आली आहे. वर्ध्यातील रामनगर परिसरात एका मौलानाने 6 वर्षीय चिमुकल्यावर अनैसर्गिक अत्याचार केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. नराधम आरोपीनं मंगळवारी सकाळी 10 च्या सुमारास एकट्या मुलाला घरात पाहिले आणि त्याच्यातील वासना जागृत झाली आणि त्याने हा धक्कादायक प्रकार केला. पीडित मुलाने हा संतापजनक प्रकार थेट आपल्या आई वडिलांना सांगितला आणि पीडित मुलाच्या आई वडिलांनी रामनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली .
पोलिसांनी गुन्हा दाखल करत नराधम आरोपी मौलानाला अटक केली असून त्याचे नाव समीउल्ला खान वल्क अब्दुल हमीद खान असं असल्याचे समजते .मौलाना समीउल्ला खान याचं शिक्षण गुजरातमधील सुरत येथील जामिया इस्लामिया अरबी मदरसातून पूर्ण झालं असून तो गेल्या दोन वर्षांपासून वर्ध्यात वास्तव्यास आहे. मुस्लीम समुदायातून देखील तीव्र निषेध व्यक्त करण्यात येत असून या मौलानाचं वय २५ वर्षे असल्याचे समजते.
आरोपी मौलाना समीउल्ला याने मंगळवारी सकाळी सहा वर्षीय मुलाला घरात एकटे पहिले आणि त्यानं मुलाला एका खोलीत बोलावले आणि या नराधमाने चिमुकल्या निरागस मुलासोबत असे धक्कादायक अनैसर्गिक कृत्य केलं . मुलासोबत असा अमानुष प्रकार केल्यावर त्याने मुलाला दमदाटी करून हाकलून दिलं आणि कोणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिली मात्र मुलाने घरी आल्यावर प्रकार आई वडिलांकडे सांगितला त्यानंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत या मौलानाला जेरबंद केले.
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा