ब्रेकिंग

उद्या ठाण्यात पाणी नाही..!

शुक्रवारी ठाण्यात पाणी नाही..

ठाणे (20 )- ठाणे महानगरपालिकेच्या पिसे येथील राँ वाँटर पंपिग स्टेशन मध्ये वाढीव क्षमतेचे पंपिग मशीन बसविण्याचे काम चालू असून सदर प्रकल्पातील दुसरा पंप चालू करणे व त्या अनुषंगाने इतर कामे करण्यात येणार आहेत. यासाठी मे. स्टेम प्राधिकरणाने देखभाल दुरूस्ती तसेच महत्वाच्या कामाकरिता शुक्रवारी 22/10/2021 रोजी सकाळी 9.00 ते शनिवारी सकाळी 9.00 वाजेपर्यंत 24 तासांचा शटडाऊन घेण्यात येणार आहे. या कालावधीत ठाणे शहराचा पाणीपुरवठा 24 तास पूर्णपणे बंद राहणार आहे.

सदर दिवशी घोडबंदर रोड, पातलीपाडा, हिरानंदानी इस्टेट,समतानगर, आकृती, सिध्देश्वर, जेल, जाँन्सन, इटरनिटी, ब्रह्मांड, विजयनगरी, बाळकूम, कोलशेत, आझादनगर, इंदिरानगर, गांधीनगर, ऋतुपार्क, साकेत, रूस्तमजी इ. भागात तसेच कळवा व मुंब्र्याच्या काही भागात पाणीपुरवठा 24 तासासाठी बंद राहणार आहे.

वरील शटडाऊनमुळे पाणीपुरवठा पूर्वपदावर येईपर्यंत पुढील 1 ते 2 दिवस कमी दाबाने पाणी पुरवठा होण्याची शक्यता आहे. तरी नागरिकांनी पाण्याचा योग्य तो साठा करून ठेवावा व ठाणे महापालिकेस सहकार्य करावे असे आवाहन पाणी पुरवठा विभागाच्या वतीने करण्यात आले आहे

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे