महाराष्ट्रसखी

डॉ वर्षा रामचंद्र चौरे धनगररत्न पुरस्काराने सन्मानित..

ठाणे धनगर प्रतिष्ठान, ठाणे जिल्हा व धनगर प्रतिष्ठान महिला मंडळ, ठाणे आयोजित धनगररत्न पुरस्कार सोहळा २०२३ हा पुरस्कार नवी मुंबईतील सुप्रसिद्ध दंतचिकित्सक तसेच सामाजिक कार्यकर्त्या डॉ. वर्षा रामचंद्र चौरे यांना काल ठाणे येथे “धनगररत्न (आरोग्य क्षेत्र) पुरस्कार २०२३” ने सन्मानित करण्यात आल्याने समाज माध्यमातून त्यांच्यावर शुभेच्छाचां वर्षाव होत आहॆ.

अमेरिकेच्या जागतिक संविधान आणि संसद परिषदेच्या सदस्य व सोबतच डॉ. वर्षा युनायटेड नेशन्स ग्लोबल टॅलेंट पूलची देखील सदस्य आहेत. सन २०२१ मध्ये, त्यांना आंतरराष्ट्रीय मानवाधिकार आयोग प्राग, झेक प्रजासत्ताक, संस्थेचे सरचिटणीस सर राफाल मार्सिन यांनी आयोगाच्या स्पेशल मॉनिटरिंग मिशन चे सदस्यत्व जाहीर केले आहे. यापूर्वी 8 मार्च 2019 रोजी माय स्टॅम्प से टेनंट या मालिकेअंतर्गत भारत सरकारच्या टपाल विभागाकडून डॉ. वर्षा चौरे जी यांचे पोस्टल स्टॅम्प जारी करण्यात आले आहे.

महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त उस्मानाबाद जिल्ह्यातील इर्ला या छोट्याशा गावातून मुंबईत वैद्यकीय शिक्षण घेऊन आरोग्य आणि सामाजिक क्षेत्रात ठसा उमटवणे हे नि:संशय कौतुकास्पद आहे.

त्यांच्या प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वाचे स्तंभलेख अनेक वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध आहेत. डॉ वर्षा पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर मेडिकल असोसिएशन मुंबई या संस्थेच्या माध्यमातून आरोग्य सेवेत योगदान देत आहेत आणि त्यांच्या अन्य संस्थांच्या माध्यमातून ते इतर सामाजिक कार्य करतात. महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त उस्मानाबाद जिल्ह्यातील इर्ला या छोट्याशा गावातून मुंबईत वैद्यकीय शिक्षण घेऊन आरोग्य आणि सामाजिक क्षेत्रात ठसा उमटवणे हे नि:संशय कौतुकास्पद आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर काम करणाऱ्या डॉ. वर्षा चौरे यांनी आपले राष्ट्रीय कर्तव्य मानत कोरोना महामारीच्या काळात नवी मुंबई महानगरपालिका आरोग्य विभागाच्या माध्यमातून दिलेले आरोग्य सेवेतील योगदान उल्लेखनीय आहे. लहानपणापासूनच धडपडणाऱ्या डॉ. वर्षा चौरे आपल्या यशाचे श्रेय नेहमी त्यांचे आई-वडील सुनीता-रामचंद्र, मार्गदर्शक डॉ. सुधीर तारे आणि गुरुजनांना देतात. प्रखर इच्छाशक्तीचे दुसरे नाव म्हणजे डॉ. वर्षा रामचंद्र चौरे या भारताच्या कन्येबद्दल केवळ त्यांचे गाव, शाळा, गुरुजन यांनाच नाही तर संपूर्ण भारतीयांना गर्व आहे. वयाच्या अवघ्या 30 व्या वर्षी डॉ. वर्षाजींची ही सर्व कामगिरी पाहून त्यांची निवड साप्ताहिक झिरो माईल या साप्ताहिकाद्वारे दरवर्षी देशभरातील केवळ 20 लोकांना दिल्या जाणाऱ्या “झिरो माईल आयकॉन अवॉर्ड 2022” मध्ये झाली होती. धनगर प्रतिष्ठान ठाणे या संस्थेचे अध्यक्ष दीपक कुरकुंडे यांनी सांगितल्यानुसार २८/०५/२०२३ रोजी, धनगर प्रतिष्ठान, ठाणे जिल्हा व धनगर प्रतिष्ठान महिला मंडळ, ठाणे आयोजित धनगररत्न पुरस्कार सोहळा २०२३ हा पुरस्कार सोहळा नरेंद्र बल्लाळ सभागृह, ठाणे महापालिका मुख्यालय ठाणे येथे आयोजित करण्यात आला होता. यावेळी आ. निरंजन डावखरे, आ. संजय केळकर, मा. नरेश मस्के, अँड. नानासाहेब मोटे, मा. बाबासाहेब दगडे, मा. सुनील कुराडे, मा. सुहास होनमाने, अँड अभिमान पाटील तसेच धनगर प्रतिष्ठानचे दीपक कुरकुंडे, तुषार धायगुडे आदी मान्यवर उपस्थित होते.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे