आपल खान्देशमहाराष्ट्र

जातो आम्ही आमच्या गावा, नको देवा मानव जन्म तो नवा..! कोरोनाने मृत शिक्षकाच्या भावस्पर्शी कवितेने अश्रू अनावर 

कविता वाचून अनेकांच्या डोळ्यात अश्रू आल्याशिवाय थांबले नसतील, असा एक प्रामाणिक तरुण उमदा धडाडीचा शिक्षकाचा कोरोनामुळे मृत्यू झाला. 

भूषण श्रीखंडे 

चोपडा : तालुक्यातील घोडगाव केंद्रातील अनवर्दे बुद्रुक येथील जिल्हा परिषद शाळेतील बत्तीस वर्षीय प्राथमिक शिक्षकाचा कोरोनाने मृत्यू झाला. पण मृत्यू होण्यापुर्वी या शिक्षकाने एक भावस्पर्शी कविता लिहली. आणि हीच कविता सोशल मिडीयावर व्हारलय झाल्यानंतर अनेकांच्या डोळ्यात अश्रू अनावर झाले.

विद्यार्थ्यांसाठी धडपडणारा, तंत्रस्नेही शिक्षक म्हणून दीपक वराडे यांची ओळख होती. जुनी पेन्शन हक्क संघटनेचे ते उपाध्यक्ष होते. पाच सप्टेंबरला ग्रामपंचायतकडून आदर्श शिक्षक म्हणून त्यांचा सत्कार करण्यात आला होता. ते हिरापूर (ता चाळीसगाव) मूळ रहिवासी होते. ते एक उत्कृष्ट कवी मनाचे असल्याने त्यांनी काही दिवसांपूर्वी आईला उद्देशून लेखन केलेली एक भावस्पर्शी कविता गुरुवारी (ता. १) सोशल मीडियावर व्हायरल झाली. ही कविता अनेकांनी वाचून या कवी मनाच्या शिक्षकाला आपोआप डोळ्यातून अश्रूंची श्रद्धांजली वाहिली. या कवितेत त्यांनी म्हटले आहे की,

जातो आम्ही परत आमच्या गावा

नको देवा मानव जन्म तो नवा..!

कोरोनाने बळी घेतलेल्या दीपक वराडे या शिक्षकाने लेखन केलेली कविता वाचून अनेकांच्या डोळ्यात अश्रू आल्याशिवाय थांबले नसतील, असा एक प्रामाणिक तरुण उमदा धडाडीचा शिक्षकाचा कोरोनामुळे मृत्यू झाला.

काही दिवसांपूर्वी चुंचाळे जि प शाळेतील प्राथमिक शिक्षक त्रिशूल पाटील हे कोरोनाबाधित झाले होते. त्रिशूल पाटील व दिपक वराडे हे दोन्ही जिवलग मित्र होते.त्रिशूलची सेवा दिपक वराडे ने केली. मात्र यात अपयश आले व त्रिशूल पाटील या शिक्षकाचे निधन झाले.अवघ्या काही दिवसातच शिक्षक दिपक वराडे हे सुध्दा कोरोना बाधित झाले.आणि आज अखेर त्यांचाही कोरोनाने बळी घेतला. एका मित्रांसोबतची मैत्री अखेर पर्यंत कायम ठेवली. दीपक वराडे यांच्या मागे आई ,वडील, बहीण ,पत्नी मुलगी असा परिवार आहे.

होतं जगायचं आम्हालाही 

पण जीवन आमच क्षण भंगूर ठरलं, 

बघायचं होतं डोळे भरुन आईला 

पण जगण्याचं स्वप्न निष्प्रभ ठरलं, 

श्वास होता गुदमरलेला 

जणू काळोख तो मृत्यूचा, 

तृष्णा तुझ्या दुधाची स्मरता 

आई पाझर तुला फुटेल का? 

डॉक्टर, नर्स, प्रशासन की सुरक्षारक्षक 

काळच झाला आमच्या भविष्याचे भक्षक! 

आई विसरणं आता चेहरा माझा हसरा 

मृत्युशिवाय आम्हाला मार्ग नव्हता दुसरा. 

काय गुन्हा होता आम्हा पामरांचा 

का? दोष नशिब कोरणाऱ्या सटीचा 

जातो आम्ही परत आमच्या गावा 

नको देवा मानव जन्म तो नवा. 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Zoom Team

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close
Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे