ब्रेकिंग

भटक्या विमुक्त जातीजमातील कर्मचारीना पदोन्नती मधील आरक्षणा संदर्भात, पाचोरा भाजप भटके विमुक्त आघाडीच्या वतीने निवेदन

भटके विमुक्त आणि ओ.बी.सी.समाजातील कार्यकर्ते आणि समाज बांधव यांनी निवेदन दिले 

पाचोरा (प्रतिनिधी) कर्मचाऱ्याच्या पदोन्नती मधील आरक्षणाबद्दल मा. सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेले प्रतिज्ञापत्र तात्काळ मागे घेऊन हे आरक्षण पूर्ववत चालू ठेवण्यासाठी पाचोरा भाजप भटके विमुक्त आघाडीच्या वतीने पाचोरा दंडाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.

कर्मचाऱ्याच्या / अधिकान्यांच्या पदोन्नती मधील आरक्षणाबद्दल मा. सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेले प्रतिज्ञापत्र तात्काळ मागे घेऊन हे आरक्षण पूर्ववत चालू ठेवण्यासाठी नव्याने प्रतिज्ञापत्र सादर करण्याबाबत.आपल्या शासनाच्या वतीने सरकारी वकील श्री नितीन पाटील यांनी भटके विमुक्त जाती जमातीच्या शासकीय कर्मचाऱ्यांच्या अधिकाऱ्यांच्या पदोन्नती मधील आरक्षणा बद्दल मा सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे. या प्रतिज्ञापत्रात भटक्या विमुक्त जातीजमातीना आरक्षण देने असंविधानिक आहे, असे म्हटले आहे. ही बाब भटक्या समाजासाठी अत्यंत अन्यायकारक व घातक आहे. यामुळे केवळ सरकारी कर्मचारी अधिकारीच नव्हे तर संपूर्ण भटक्या विमुक्त समाजामध्ये तीव्र संतापाची लाट पसरली आहे.

भटक्या विमुक्त मधील बहुतेक जातीची अनुसूचित जाती जमाती मध्ये समावेश व्हावा अशी अनेक वर्षापासून मागणी आहे. अनुसूचित जाती जमाती प्रमाणेच भटक्या विमुक्ताना लोकसंख्येच्या प्रमाणात सरकारी नोकरीत आरक्षण, राजकीय आरक्षण शैक्षणिक आरक्षण तसेच पोटासाठी भटकंती करणाऱ्या या समाजासाठी अक्ट्रोसिटी कायदा लागू करणे व अर्थसंकल्पात लोकसंखेच्या प्रमाणात निधीची तरतूद करणे या सर्व मागण्या अनेक वर्षांपासून हा समाज करत असताना त्यावर आपण कोणतीही कार्यवाही न करता सध्या मिळत असलेले तुटपुंजे आरक्षणही आपल्या नेतृत्वाखाली आघाडी सरकारचे तथाकथित शिल्पकार व मार्गदर्शक सतत शाहू, फुले आंबेडकरांच्या नावाचा ढोंगी घोष करणारे खा. शरद पवार यांच्या सल्ल्यानुसार आघाडी सरकारचा डाव दिसून येत आहे. हा डाव संपूर्ण समाजाच्या लक्षात आला आहे. राज्यात सुमारे २०% असलेला हा भटका समाज आपल्या पक्षासह सरकारमध्ये सहभागी असलेल्या इतर दोन राजकीय पक्षाला मोठा धडा शिकवल्या शिवाय स्वस्थ बसणार नाही.

तरी आपण या विषयाचे गांभीर्य ओळखून मा न्यायालयात सादर केलेले प्रतिज्ञापत्र तात्काळ मागे घेऊन भटक्यांचे आरक्षण पुर्ववत चालू ठेवण्यासाठी नव्याने प्रतिज्ञापत्र दाखल करावे.अन्यथा याविरोधात भाजप भटके विमुक्त आघाडीच्या वतीने संपूर्ण राज्यभर तीव्र आंदोलन करण्यात येईल. या ‘आंदोलनाच्या परिणामास शासन जबाबदार असेल.

तरी आपण वरील विषयी तात्काळ कार्यवाही करून भटक्या समाजावरील अन्याय दूर करावा ही विनंती. असे निवेदन पत्रात म्हटले आहे, सदर निवेदन भाजपाचे पाचोरा तालुका अध्यक् युवा नेते मा.अमोल भाऊ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली देण्यात आले.


तिघाडी सरकारने भटके विमुक्त,ओ.बी.सी.ई.समाजाचे आरक्षण रद्द केल्याने भाजप भटके विमुक्त आघाडी च्या वतीने आज राज्यभर आंदोलने, निदर्शने करण्यात येत आहे,

पाचोरा येथे भाजपा तालुका अध्यक्ष मा.अमोल भाऊ शिंदे याच्या मार्गदर्शनाखाली तालुका अध्यक्ष संजय परदेशी, सो.मि.प्र.गणेश परदेशी, कीशोर पेंढारकर, विलास पाटील, निव्रुत्त हाटकर, ई.नि पाचोरा येथे ऊपविभागीय अधिकारी मा.विक्रम बांदल साहेब यांना मागण्यांचे निवेदन सादर केले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे