आपल खान्देशब्रेकिंग

जळगाव जिल्हा बँकेत भाजपला धक्का, महाविकास आघाडीचा 20 जागांवर विजय, रोहिणी खडसेंचा एकतर्फी विजय!!

जळगाव : उत्तर महाराष्ट्रातील राजकीयदृष्ट्या महत्त्वाची असलेल्या जळगाव जिल्हा बँकेच्या 10 जागांची मतमोजणी सुरु आहे. मतमोजणीत सुरुवातीला काही धक्कादायक निकाल लागले आहेत. महाविकास आघाडीच्या सहकार पॅनेलचे एकूण 20 उमेदवार विजयी झाले आहेत तर एका मतदार संघात अपक्ष उमेदवार भाजपा आमदार संजय सावकारे विजयी झाले आहेत. तर, रावेरात धक्कादायक निकाल लागला असून महाविकास आघाडीच्या सहकार पॅनेलच्या जनाबाई गोंडु महाजन एक मतानं विजयी झाल्या आहेत. सहकार पॅनेलच्या जनाबाई गोंडु महाजन यांनी विरोधी उमेदवार अरुण पाटील यांना जाहीर पाठिंबा दिला होता. तर, एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे याचा देखील विजय झाला आहे. जिल्हा बँक निवडणुकीत महाविकास आघाडीनं भाजपला धक्का दिला आहे. 21 जागांपैकी 11 जागा राष्ट्रवादी काँग्रेस, 7 जागांवर शिवसेना, 2 जागांवर काँग्रेस आणि एका जागेवर भाजप उमेदवार विजयी झालाय.

रोहिणी खडसे विजयी

जळगाव जिल्हा बँकेच्या निवडणुकीत अॅड. रोहिणी खडसेंचा विजय झाला आहे. ओबीसी महिला राखीव मतदारसंघातून रोहिणी खडसे यांनी एकतर्फी विजय मिळवला आहे. हा विजय म्हणजे गेल्या 6 वर्षांत केलेल्या कामाची पावती असल्याची प्रतिक्रिया रोहिणी खडसेंनी व्यक्त केली आहे. यापुढंही जिल्हा बँक आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी काम करणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Zoom Team

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close
Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे