आपल खान्देश

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना एककाचा नाविन्यपूर्ण उपक्रम “नेस्ट्स फ्रॉम वेस्ट”

वापरलेल्या ओल्या नारळाचे घरटे बनविण्याचा नावीन्यपूर्ण उपक्रम केलाय.

झूम मराठी न्यूज नेटवर्क

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना एककाचा नाविन्यपूर्ण उपक्रम “नेस्ट्स फ्रॉम वेस्ट” वापरलेल्या ओल्या नारळाचे घरटे बनविण्याचा नावीन्यपूर्ण उपक्रम केला.नारळी घरटी घेऊन त्यांना राष्ट्रीय सेवा योजना आणि भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव असलेले स्टिकर्स लावून वेगवेगळ्या झाडांना बांधली.

पूज्य साने गुरुजी कला विज्ञान,आणि वाणिज्य महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना एककाने, तापमानात अतीशय मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने चिमण्यासाठी SAVE SPARROW या मोहिमेअंतर्गत वापरलेल्या ओल्या नारळाचे घरटे बनविण्याचा नावीन्यपूर्ण उपक्रम केला. स्वयंसेवकांनी प्रयोग म्हणून सुरुवातीला 50 नारळी घरटी घेऊन त्यांना राष्ट्रीय सेवा योजना आणि भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव असलेले स्टिकर्स लावून वेगवेगळ्या झाडांना बांधली. त्याचबरोबर रिकाम्या पाण्याच्या बतल्यांना छिद्रे करून त्या पाण्याने भरून झाडांजवळ बांधून पाणी व्यवस्थापन करण्याचे नियोजिले. उपक्रमाच्या उदघाटन महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. आर. एस.पाटील, उपप्राचार्य एम. के.पटेल यांच्या उपस्थितीत करण्यात आले व त्यांनी स्वयंसेवकांच्या उस्फूर्त कार्याचे कौतुक केले. उपक्रमास रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा.राजेंद्र पाटील, प्रा. वर्षा चौधरी, प्रा. वजीह अशहर,राष्ट्रीय सेवा योजना संचालक प्रा डॉ सचिन नांद्रे यांचे मार्गदर्शन लाभले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे