आपल खान्देश
पाचोरा शहरात हजारो लिटर पिण्याचं पाणी जातय नाल्यात!
रन रणत्या उन्हात पाण्यासाठी दहा दहा दिवस वाट पाहून ही पुरेसे पाणी येत नसताना पाण्याची नासाडी होत आहॆ
झूम मराठी न्यूज नेटवर्क
पाचोरा शहरात सध्या भीषण टंचाईचा सामना करावा लागत आहॆ, रन रणत्या उन्हात पाण्यासाठी दहा दहा दिवस वाट पाहून ही पुरेसे पाणी येत नाही, त्यातच गिरड रोड वरील सांडू भाऊराव कॉप्लेक्स लगत नाल्यात पिण्याच्या पाण्याची पाइपलाइन मधून हजारो लिटर पाणी वाया जात आहॆ , पाचोरा नगरपालिका गलथान कारभारामुळे पाण्याची पाईप लाईन मधून पाण्याची नासाडी होत आहॆ. त्यामुळे हजारो लीटर पाणी वाया जात आहॆ हे पालिकेचे नुकसानच आहॆ. तरी पालिकेने त्वरित यावर लक्ष देऊन काम करावे.
तसेच अशा प्रकारे कुठे कुठे पाण्याची नासाडी होत आहॆ त्यावर लक्ष देऊन त्यावर काम करावे पाचोरा शहरातील काही भागांमध्ये अनेक नळांना तोट्या नाहीत. त्यामुळे गटारीमधून पाणी वाहून वाया जाते. या प्रकारास आळा घालण्यासाठी नगरपालिकेकडून जनजागृती सुरू करावी.



