आपल खान्देश

चाळीसगावात भेसळयुक्त दूध पिल्याने अनेकांचे आरोग्य धोक्यात

चाळीसगाव – चाळीसगावमध्ये मोठ्या प्रमाणावर भेसळयुक्त दुधाची विक्री होत आहे. दुधाची भेसळ केली जात आहे. ते आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत घातक ठरत आहे. बिगर भेसळीचे दूध 60 ते 65 रुपये लिटर या दराने विकले जाते. मात्र भेसळयुक्त दूध 40 ते 45 रुपये लिटर दराने दिले जाते. दूध स्वस्त मिळते म्हणून जवळपास 60 ते 65 टक्के लोक हे स्वस्तातील दूध घेतात. मात्र या दुधात जीवघेणी भेसळ केलेली असते. दुधात जे पाणी टाकले जाते ते पाणी अशुद्ध असते. आणि म्हणून भेसळयुक्त व दूषित पाणी टाकलेली दूध पिल्याने लहान मुलांसह मोठ्या माणसांना देखील डायरीयाची लागण झाल्याचे दिसून येत आहे.

पावसाळ्यात भेसळयुक्त दूध पिल्याने अनेकांचे आरोग्य धोक्यात आलेले आहे. चाळीसगावातील दवाखाने आधीच साथीच्या आजारांनी गच्च भरले आहेत.आणि म्हणून या सर्व प्रकाराच्या अनुषंगाने अन्न व औषध प्रशासनाने चाळीसगावकडे लक्ष देऊन दुधात भेसळ करणार्‍यांच्या विरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी चाळीसगाव मधील नागरिकांकडून करण्यात आली आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Zoom Team

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे