आपल खान्देशगुन्हेगारी

चर्मकार समाजाच्या मुलीवर झालेल्या अन्यायाच्या विरोधात पाचोरा प्रांत अधिकारी यांना निवेदन

बिलवाडी येथील चर्मकार समाजाच्या मुलीवर झालेल्या अन्यायाच्या विरोधात पाचोरा प्रांत अधिकारी यांना निवेदन

@ दिलीप पाटील पाचोरा

पाचोरा दि: 25 – आज दिनांक 25 रोजी शुक्रवारी ठीक 11 वाजता चर्मकार समाज पाचोरा तालुका व शहर तसेच राष्ट्रीय चर्मकार महासंघ पाचोरा तालुका व शहर यांच्या संयुक्त विद्यमाने बिलवाडी ता जामनेर येथील मुलीवर लैंगिक शोषण करून तिच्यावर बलात्कार व अत्याचार केल्याप्रकरणी सहा आरोपींना पोलीस प्रशासनाने अटक करून त्यांना पोस्को अंतर्गत तसेच दलित अत्याचार प्रतिबंधक कायद्यातंर्गत गुन्हा नोंद केला असून याबाबत आज पाचोरा येथे प्रांत अधिकारी श्रीयुत राजेंद्र कचरे साहेब यांना निवेदन देण्यात आले असून त्यात आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी, पीडित कुटुंबातील व्यक्तींना पोलीस संरक्षण मिळाले पाहिजे,तसेच पीडित कुटुंबास शासनाकडून आर्थिक साहाय्य मिळाले पाहिजे याबाबत निवेदन तालुक्यातील चर्मकार समाजाचे जेष्ठ नेते व राष्ट्रीय चर्मकार महासंघ जळगाव जिल्हा जिल्हासंघटक आदरणीय श्रीयुत अनिल सावंत सर यांच्या नेतृत्वाखाली तसेच राज्य शिक्षक आघाडी प्रदेश उपाध्यक्ष श्री मनोज पवार सर यांच्या उपस्थितीत देण्यात आले याप्रसंगी तालुकाध्यक्ष श्री राजेंद्र सोनवणे, तालुका सचिव उमेश सोनवणे, कर्मचारी आघाडी जिल्हाध्यक्ष श्री बी बी मोरे, कर्मचारी आघाडी शहराध्यक्ष श्री प्रकाश रोझतकर, युवा आघाडी तालुकाउपाध्यक्ष नितीन बेंडाळे गाळण येथील सरपंच श्री राजेंद्र सावंत उपस्थित होते.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे