ब्रेकिंगमहाराष्ट्र
कौतुकास्पद : महाराष्ट्रातील महिला पोलिसांची ड्युटी १२ तासांवरून ८ तास करण्याचा राज्य सरकारचा निर्णय
मुंबई :- राज्य सरकारने महाराष्ट्रातील महिला पोलिसांसाठी एक मोठा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालकांच्या संकल्पेनेनुसार पोलीस दलातील महिला कर्मचाऱ्यांना १२ तास वरून आता आठ तासाची ड्युटी देण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे. याबाबत राज्याचे पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी हि माहिती दिली.
पोलीस दलात कर्तव्य करीत असलेल्या महिलांना बारा तास काम करावे लागते. महिला पोलिसांना कामाबरोबरच कौटुंबीक जबाबदारी पार पाडावी लागते. अनेक वेळा सण-उत्सव बंदोबस्त गंभीर गुन्हे यानिमित्ताने वर्षभरातून अनेक वेळा 12 तासापेक्षा जास्त कर्तव्य बजावावं लागत. त्यामुळे त्यांच्या कौटुंबीक जबाबदारीवर आणि कर्तव्यावर परिणाम होत असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.
महाराष्ट्र सरकारने महिला पोलीसांची ड्युटी बारा तासांहून आठ तासांची करण्याचा निर्णय घेतला आहे. हा अतिशय चांगला निर्णय असून यामुळे अनेक महिला पोलीस कर्मचाऱ्यांना कुटुंब आणि नोकरी यामध्ये उत्तम असा ताळमेळ साधता येणे शक्य होणार आहे.
— Supriya Sule (@supriya_sule) September 24, 2021
सुप्रिया सुळे यांनी ट्विट करत मानले मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांचे आभार



