आपल खान्देशआरोग्य व शिक्षण

विघ्नहर्ता मल्टीस्पेशालिटी हाॅस्पिटल पाचोरा तर्फे वडाळा -वडाळी मोफत आरोग्य तपासणी शिबिर 

विघ्नहर्ता मल्टीस्पेशालिटी हाॅस्पिटल पाचोरा तर्फे वडाळा -वडाळी मोफत आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले 

पाचोरा – वडाळा -वडाळी येथे विघ्नहर्ता मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल&डॉ.भूषण मगर पाटील फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच ग्रामस्थ मंडळी वडाळा-वडाळी यांच्या सहकार्याने भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी डॉ भूषणदादा मगर,डॉ.सोहेल शेख सह विघ्नहर्ता हाॅस्पिटल टीम उपस्थित होते.

तसेच देशाच्या रक्षणार्थ शहीद झालेले जवान शहीद सोपान आमले,शहीद गणेश अहिरराव यांच्या पुतळ्यास माल्यार्पण विघ्नहर्ता मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे संचालक डॉ भूषण मगर-पाटील यांनी माल्यार्पण करून अभिवादन केले.

आरोग्य शिबीर कार्यक्रमास सरपंच, उपसरपंच, गावातील तरुण मित्र परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे