आपल खान्देशराजकीय

ओबीसी नेत्यांचे नेतृत्व संपविताना हा कळवळा कुठे गेला होता?

जळगाव : भाजपातील ओबीसी नेत्यांना संपवण्याचे काम केले आणि त्याच भाजपाला ओबीसींचा कळवळा कधीपासून यायला असा खोचक टोला भाजपचे विरोधीपक्षनेता देवेंद्र फडणवीस यांच्यावर राष्ट्रवादीच्या  अॅड. रोहिणी खडसे  यांनी त्यांच्या ट्विट करून लगावला आहे.

भाजपाला ओबीसींचा कळवळा कधीपासून यायला लागला ? ओबीसी नेत्यांचे नेतृत्व संपविताना हा कळवळा कुठे गेला होता? आता गळा काढण्यात अर्थ नाही.

राज्यातील काही जिल्हा परिषद व पंचायत समितीचीच्या पोट निवडणूका राज्य निवडणूक आयोगाने नुकताच जाहीर केल्या. परंतू त्यात ओबीसी जागांवरील आरक्षण रद्द झाल्याने या निवडणूकांबाबत राज्यसरकराने घेतलेल्या निर्णयावर विरोध दर्शवीला आहे. यामुळे ओबीसी जागांवरीर आरक्षण रद्द झाल्याने त्या लढवीता येणार नाही. याबाबत विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी भाजप राज्यात चक्काजाम आंदोलन करणार असल्याचे जाहीर केले. यावर राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांच्या कन्या अॅड. रोहिणी खडसे-खेवलकर यांनी फडणवीसांना ट्विटरद्वारे टोला लगावीला आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Zoom Team

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे