आपल खान्देशगुन्हेगारी
Pachora | एका तरुणास मारहाणप्रकरणी उपनिरीक्षकाविरुद्ध गुन्हा..!
पाचोरा येथील पोलिस ठाण्यात नियुक्तीस असलेले उपनिरीक्षक जितेंद्र वल्टे यांनी केवळ संशयावरून तरूणास मारहाण केल्याप्रकरणी त्यांच्याविरुद्ध जखमी तरुणाच्या तक्रारीवरून येथील पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. गेल्या २२ नोव्हेंबरला रात्री उल्हासनगर येथील प्रथम गायकवाड हा तरुण भडगाव रोड भागातील कॉलेज चौफुलीजवळ उभा असताना वल्टे यांनी संशयाच्या कारणावरून चापटा बुक्क्यांनी मारहाण केली. मारहाण प्रसंगी सोडविण्यासाठी आलेले प्रथमचे मामा संदीप ब्राम्हणे यांनाही मारहाण करण्यात आली. या मारहाणीत जखमी झालेल्या प्रथमवर पाचोरा खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले. जखमी तरुण प्रथम गायकवाड यांनी पोलिसात प्रकरणी तक्रार दिल्याने पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. पोलिस निरीक्षक राहुल खताळ तपास करीत आहेत.



