ब्रेकिंग

Jalgoan | जळगाव जिल्हा पोलीस दलात सहा वर्षांच्या अविरत सेवेनंतर ‘वीरू’चा मृत्यू….!

जळगाव पोलीस दलातील बॉम्ब शोधक नाशक पथकात सहा वर्षे सेवा बजाविणाऱ्या वीरू नावाच्या श्वानाचे आज निधन झाले.

  • दिलीप जय परदेशी

जळगाव जिल्हा पोलिस दलाचा भाग असलेल्या श्वानपथकातील बॉम्ब शोधणा-या श्वानाचा आज शनिवारी निमोनिया आजारामुळे मृत्यू झाला. त्याच्यावर जळगाव पोलिस मुख्यालयात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ एम. राजा यांच्या वतीने पोलिस दलातर्फे त्याला श्रद्धांजली वाहिली. तसेच जळगाव पोलिसांतर्फे मानवंदनाही देण्यात आली.

पोलिस दलात काम करणाऱ्या श्वानांना कर्मचाऱ्याचा दर्जा असतो. जळगावच्या श्वान पथकात बॉम्ब शोधण्याचे काम करणारे वीरू हे श्वान काही दिवसांपासून आजारी होते. जळगावच्या पशुवैद्यकीय रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, त्याचे शरीर उपचारांना प्रतिसाद देत नव्हते. आज वीरूचा दुर्दैवी मृत्यू झाला.

जळगाव जिल्हा पोलीस दलातील बॉम्बशोधक व नाशक पथकातील वीरू नामक श्वान याचे आज रोजी निमोनिया या आजाराने निधन झाले. जळगाव पोलीस दलात तो सहा वर्षापासून कार्यरत जळगाव पोलीस यांच्याकडून शहीद श्वानाला श्रद्धांजली अर्पण करून मानवंदना देण्यात आली.

  • कुत्रा आणि श्वान

चित्रपटात एखाद्याला वाईट मृत्यू द्यायचा असला तर कुत्ते की मौत असा शब्द वापरला जातो. रस्त्यावर बेवारस फिरणा:या कुत्र्यांचा ज्या पद्धतीने मृत्यू होतो त्याच्यावरून कदाचित हा शब्दप्रयोग प्रचलित असावा. मात्र, समाजासाठी सेवा देणा:या कुत्र्यासाठी श्वान असा मानाचा शब्द वापरला जातो. विक्कीवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार झाले ते पाहता कुत्रा आणि श्वान यातील फरक अधोरेखित होतो. एखाद्या कुत्र्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्याची ही जिल्ह्यात पहिलीच वेळ असावी. कारण या पथकात काम करणारे श्वान इतके ठणठणीत असतात की ते सेवानिवृत्त झाल्यानंतरच मरतात.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे