आपल खान्देशमहाराष्ट्र

पुढच्या पाच पिढ्यांची रोहित पवारांमुळे माती होईल: पडळकर

Published by Vaibhav kale@Editor_Zoom Marathi news media 

कर्जत जामखेड मतदार संघाच्या दौऱ्यावर असलेल्या आमदार गोपीचंद पडळकर यांनी आमदार रोहित पवार यांच्यावर घाणाघाती टीका केली आहे. श्रीगोंदा कर्जत चा हक्काचं पाणी मिळवून देण्यात अपयश आलेल्या रोहित पवार हे कामामध्ये कधीकधी आणि श्रेयामध्ये सर्वात आधी असल्याचं पडळकर यांनी म्हटलं आहे.

आपणच मुख्यमंत्री असल्यासारखं रोहित पवार केंद्र सरकार वर बोलतात. मात्र, आपल्या मतदारसंघातील प्रश्‍न सोडविण्याकडे मात्र, त्यांचे लक्ष नाही. बारामती ॲग्रो च्या माध्यमातून शेतकऱ्यांना दिलेल्या कोंबड्याच्या खाद्यांने मोठे नुकसान झाल्याची तक्रार एका तरुणाने आपल्याकडे केली असल्याचे सांगत रोहित पवार हे शरद पवारांचं सुधारित व्हर्जन असून गेल्या पाच पिढ्यांची शरद पवारांनी माती केली आहे. आता पुढच्या पाच पिढ्यांची रोहित पवारांमुळे माती होईल. असं पडळकर यांनी म्हटलं आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Zoom Team

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close
Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे