राज्यातील धनगर समाजाच्या महिलानां सक्षमीकरणासाठी शितल चिंचोरे यांचे धनगर समाजाच्या नेत्यांना साकडे
माजी खासदार विकास महात्मेनां धनगर समाजातील महिला सक्षमीकरण करण्यास मदत होईल अशी मागणी केली
झूम मराठी ऑनलाईन न्यूज मीडिया
@ दिलीप जय परदेशी
ठाणे (झूम मराठी) आजच्या काळात महिला सक्षमीकरण हा चर्चेचा विषय बनला आहे. खासकरून मागासवर्गीय व प्रगतशील देशांमध्ये महिला सक्षमीकरणासाठी भर दिला जात आहे. कारण आज प्रत्येकाला कळून चुकले आहे की देशातील स्त्रियांच्या प्रगती शिवाय देशाची प्रगती शक्य नाही म्हणून धनगर समाजाच्या महिलांना सक्षमीकरणासाठी शितल चिंचोरे यांनी धनगर समाजाच्या नेते खासदार डॉ. विकास महात्मे व धनगर समाजाचे विचारवंत देविदास (बापुसाहेब) हटकर यांची भेट घेऊन साकडे घातले.
बघा व्हिडीओ मुख्यमंत्री शिंदे यांचे न्यूयॉर्क मधील फॅन ने वाढदिवस अश्या पद्धतीने केला साजरा
___________________________________
केंद्र शासनाच्या स्टॕड अप इंडिया योजने अंतर्गत धनगर समाजातील महिलांकरिता मार्जिन मनी उपलब्ध करुन देणे बाबतच्या सदर जीआर चा आधार घेत शितल चिंचोरे यांनी मुंबई येथे माजी खासदार डॉ. विकास महात्मे व धनगर समाजाचे जेष्ठ विचारवंत देविदास (बापुसाहेब) हटकर यांची भेट घेऊन महाराष्ट्रातील धनगर समाजातील महिला केंन्द्र शासनाच्या स्टॕड अप इंडिया योजनेतील महिलाना मार्जिन मनी उपलब्ध करुन देण्यासाठी २५० कोटीची तरतुद करण्यात आलेली आहे, पंरतु त्यांच्या फायदा किती धनगर समाजातील किती महिलांना झाला हा संशोधनाचा विषय आहे. विशेष म्हणजे ७५% कर्ज तर २५% मध्ये १५% लाभार्थीना SIDBI यांच्या मार्फत सुट तर १०% स्वहिस्सा आहे. तरी देखील महिला उद्योजक तयार होत नाहीत, अशी खंत त्यांनी व्यक्त केली, खरोखर महाराष्ट्रातील खासकरुन ग्रामीण विभागातील धनगर समाजातील महिलांना आर्थिक सशक्त करायचे असेल तर महिला गट तयार करुन त्यांना शेळ्या मेंढ्यासाठी कर्ज उपलब्ध करुन दयावे अशी मागणी केली.

त्यासाठी त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रात फिरुन धनगर महिला बंदिस्त शेळी मेंढी व्यवसाय सहकारी संस्था मर्या. रजिस्टर्ड केल्या. आश्या १८०० संस्था रजिस्टर्ड केल्या आहेत, एका संस्थेत ३० महिला सभासद आहेत म्हणजे एकूण ५४००० ग्रामीण महिला सभासद आहेत. सदर संस्थेचा या जी आर मध्ये समाविष्ट करावा थोडीशी सुधारणा करुन धनगर समाजातील गटातील महिला सक्षमीकरण करण्यास मद्दत होईल अशी मागणी त्यांनी केली. त्यांना विकास महात्मे यांनी सकारत्मक प्रतिसाद दिला व पाठपुरावा करुन दुरुस्ती साठी प्रयत्न करुया असे सांगितले व बापुसाहेब हटकर यांनी शितलताईचे कार्याचे कौतुक केले शासन दरबारी सदर योजना समाविष्ट करण्यासाठी मुख्यमंत्री, उपमुंख्यमंत्री, व संबधीत इतर मंत्री व शासकीय आधिकारी यांना निवेदन देवुन बैठकी घेवुन पाठपुरावा करावा असे सांगितले. यावेळेस त्यांनी सर्वांनी अहिरराष्ट्र कान्हदेश हे पुस्तक देवुन स्वागत केले.

सदर मान्यवरांची बैठक उत्तर महाराष्ट्राचे नेते ज्ञानेश्वर परदेशी यांनी घडवुन आणली सोबत, युवा उद्योजक शंकर कोळेकर, मोहळाईचे माजी सरपंच व संभाजीनगर उत्तर महाराष्ट्र धनगर महासंघाचे अध्यक्ष राजेंन्द्र परदेशी, नवीमुंबई जिल्हा अध्यक्ष संदिप पांढरे, धनगर समाज संघर्ष समितीचे ठाणे जिल्हा उपाध्यक्ष संदिप माने, अम्बरनाथ तालुका अध्यक्ष गणेश गढरी, बदलापुर अध्यक्ष रांजेंन्द्र गढरी, धनगर समाज बहुउद्देशीय मंडळाचे अध्यक्ष भुषण लांडगे, रावसाहेब तेले, विजय मनोरे, पंकज तेले, इ. समाज बांधव उपस्थित होते.



