आपल खान्देश
पाचोरा लाईव्ह – संत शिरोमणी नामदेव महाराज संजीवन समाधी सोहळा संपन्न
पाचोरा – संत शिरोमणी नामदेव महाराज यांच्या ६७१ संजीवन समाधी सोहळा शासनाने दिलेल्या नियमांचे पालन करून घरगुती वातावरणात संपन्न करण्यात आला
श्री शिरोमणी संत नामदेव महाराज यांच्या संजीवन समाधी सोहळा निमित्त श्री जीवराज खैरनार यांच्या घरी श्री सत्यनारायनाची महापूजा करण्यात आली व श्री संत नामदेव महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन समाजाचे जेष्ठ सदस्य श्री मूरलीधर सोनवणे ,अखिल भारतीय मध्यवर्ती संस्था उपराज्यसंघटक श्री अरुण अण्णा खैरनार , अखिल भारतीय युवा राज्य संघटक श्री योगेश सोनवणे, श्री संत नामदेव महाराज बहुउद्देशीय मंडळाचे अध्यक्ष श्री जनार्दन सोनवणे व नूतन महिला अध्यक्ष सौ रजनी नेरपगार यांच्या हस्ते करण्यात येऊन मंडळाचे अध्यक्ष श्री जनार्दन सोनवणे यांनी श्री संत नामदेव महाराज यांच्या जीवनावर आधारित माहिती दिली व कोरोना बद्दल जनजागृती करून सर्व समाजाने स्वताची व आपल्या परिवाराची काळजी घेऊन सर्व समाज बांधव व भगिनी यांनी लस घेण्याचे आवाहन केले तसेच श्री जीवराज खैरनार यांचे आभार मानले त्या प्रसंगी समाजाचे कार्यध्यक्ष श्री किशोर निकुंभ सचिव सुनील बाविस्कर , श्री शशिकांत धुळेकर श्री प्रकाश नेरपगार ,श्री रवींद्र सोनवणे , श्री अनिल बाविस्कर ,श्री कैलास कापुरे श्री संजय शिंपी , भूषण शिंपी ,नंदू शिंपी , अभिषेक सोनवणे अशोक संन्याशी व महिला मध्ये सौ सुनीता खैरनार ,उपाध्यक्ष सौ सविता जगदाळे, सौ अलका निकुंभ, सौ अनिता रवींद्र सोनवणे ,सौ शीतल सोनवणे , इत्यादी सर्व समाज बांधव व भगिनी उपस्थित होत्या






