दिवाळीपूर्वी महागाईचा सामान्य लोकांना झटका , गॅस सिलिंडरच्या किमतीत वाढ
भारतात वाढत्या महागाईने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले असून दिवाळीपूर्वी जनतेला पुन्हा एकदा महागाईचा जबर फटका बसला आहे. नोव्हेंबरच्या पहिल्याच दिवशी पेट्रोलियम कंपन्यांनी गॅसच्या दरात वाढ केली असून LPG गॅस सिलिंडरच्या दरात 266 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. मात्र, ही वाढ केवळ व्यावसायिक सिलिंडरमध्येच झाली असून घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही ही दिलासादायक बाब आहे.
विनाअनुदानित 14.2 किलो घरगुती एलपीजी सिलिंडरची किंमत 905 रुपये इतकी आहे. मागील गेल्या दहा महिन्यात एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत जवळपास 300 रुपयाची वाढ झाली आहे. वाढत्या महागाईने सर्वसामान्यांचे जगणे कठीण झाले आहे.
266 रुपयांच्या वाढीनंतर, दिल्लीत व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या किमतीत 2000.5 रुपयांची वाढ झाली आहे, जी पूर्वी 1734.5 रुपये होती. तर मुंबईत 19 किलोच्या व्यावसायिक गॅस सिलेंडरसाठी 1950 रुपये मोजावे लागणार आहेत. आता कोलकातामध्ये 19 किलोचा गॅस सिलिंडर 2073.50 रुपयांना झाला आहे, तर चेन्नईमध्ये आता 19 किलोचा सिलेंडर 2133 रुपयांना मिळणार आहे.









