आपल खान्देशगुन्हेगारी

जळगाव : आतेभावाचा हातपाय बांधून बहिणीवर अत्याचार

जळगाव (प्रतिनिधी)जळगाव तालुक्यात राहणाऱ्या १४ वर्षीय मुलीवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना घडलीय. तिच्या आतेभावानेचं हातपाय बांधून तिच्यावर अत्याचार केला. या प्रकरणात ती मुलगी गर्भवती झाली. याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी गुरुवारी संशयित तरुणाला अटक केली आहे.

घटना मे-जून २०२१ दरम्यान घडली. पीडिताचे आई वडील एके दिवशी शेतात गेले होते. त्यावेळी गावातच राहणारा पीडिताचा आतेभाऊ दुपारी घरी आला. तोंडाला रुमाल व साडीने हातपाय बांधून त्याने पीडितावर अत्याचार केला.

उलट्या होत असल्याने …

या घटनेची कुठे वाच्यता केली तर मारुन टाकण्याची धमकी दिली. त्यामुळे पीडिताने भीतीपोटी कोणालाच सांगितले नाही. आता गेल्या आठ दिवसांपासून उलट्यांचा त्रास होत आहे. त्यामुळे गुरुवारी आईने जिल्हा रुग्णालयात मुलीला उपचारासाठी आणले होते. त्यावेळी ती गर्भवती असल्याचे डॉक्टरांनी सांगितले, हे ऐकून आईला जबर धक्का बसला. याबाबत तिला आईने विश्वासात घेऊन विचारणा केली. त्यावेळी मुलीने झाल्या प्रकाराची माहिती दिली. या घटनेनंतर महिलेने पती व मुलीला घेऊन एमआयडीसी पोलीस ठाणे गाठले.

संपूर्ण घटनाक्रम सांगितला. पोलीस निरीक्षक प्रताप शिकारे यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेतले. त्यांनी तातडीने संशयिताच्या अटकेसाठी पथक रवाना केले.

म्हसावद दूरक्षेत्राचे हवालदार बळीराम सपकाळे, स्वप्नील, पाटील, प्रदीप पाटील, हेमंत पाटील व होमगार्ड नितीन चिंचोरे यांचे पथक रवाना झाले. पथकाने त्याला सायंकाळी एका गावातून ताब्यात घेतले. रात्री आठ वाजता त्याला अटक करण्यात आली. पीडितेच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल झाला आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे