आंजोळा तालुका सोयगाव येथील एका शेतकऱ्यांचे शेतीतील कपाशीचे चार ते पाच एकर क्षेत्र उपटून फेकले!!
सोयगावं (प्रतिनिधी) तालुक्यातील आंजोळा येथील एका शेतकऱ्यांचे शेतीतील कपाशीचे चार ते पाच एकर क्षेत्र उपटून फेकले!!संशयीताने मजूर लावून चार ते पाच एकर कपाशीचे झाडे उपटून फेकल्याचा दावा नुकसान ग्रस्त शेतकऱ्याने तक्रार केली आहे.
सविस्तर वृत्त असे कि, आशाबाई शंकर परदेशी मौजे आंजोळा राहणार वाकडी तालुका सोयगाव यांच्या शेती वरून वाद सुरू असून वादातून सामनेवाले विद्या दामोदर पाटील राहणार लासुरा तालुका चोपडा यांनी मजूर लावून चार ते पाच एकर कपाशीचे झाडे उपटून फेकल्याचा संशय आशाबाई शंकर परदेशी यांनी केला आहे!तसेच आशाबाई यांनी 21/8 रोजी सोयगाव पोलीस स्टेशनला तक्रार अर्ज देण्यासाठी गेल्या त्यांना सामने वाल्याने शेतात येऊन धमकी दिली तुझ्या बाजूने निकाल लागला आहे! त्याचा बदला घेण्यासाठी मी तुझे थकपाशीचे झाडे उपटून फेकेल अशी धमकी दिल्यामुळे आशाबाई यांनी तक्रार अर्ज सोयगाव पोलीस स्टेशनला देण्यासाठी गेले असता त्यांचा अर्ज स्वीकारला नाही!
त्यांनतर 14/15 तारखेत खरच कपाशीचे झाड उपटली गेली! तो जर अर्जाची माहिती सोयगाव पोलीस स्टेशन ने घेतली असती तर आज हा प्रकार घडला नसता! त्यामुळे आशाबाई व त्यांचे नातेवाईक यांनी औरंगाबाद येथे दोन तारखेला एसपी सो: औरंगाबाद यांना वरील तक्रार देऊन अर्जामध्ये नमूद केलेले संभाषण एस पी साहेबांना सांगितल्यावर एस पी यांनी त्या अर्जाची त्वरीत दखल घेतली कारण त्या अर्जात नमूद केले होते की कार्यवाही झाली नाही तर आम्ही आत्मदहन करू असा इशारा आशाबाई शंकर परदेशी व त्यांच्या नातेवाईकानी केला होता त्यानुसार पंधरा तारखेला म्हणजे कपाशी झाड उपडल्यानंतर पंचनामा करण्यासाठी सोयगाव पोलीस स्टेशन चे ए पी आय शिरसाट साहेब आणि पोलीस सहकाऱ्यांनी केला!! पी एस आय पांचोळे सर यांच्या मार्ग दर्शनाने पुढील तपास ए पीआय शिरसाट व त्यांचे सहकारी करित आहे!
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा