आपल खान्देश

ज्वारीच्या शेतात गांजाची लागवड, पोलिसांनी केला पर्दाफाश

 

एलसीबी व धडगाव पोलीस यांच्या संयुक्त कारवाईत गांजाची झाडे जप्त करण्यात आली असून पोलिसांनी चार लाख ५३ हजार ३२० रुपयांची गांजाची झाडे जप्त केली आहेत.

झूम मराठी नदुरबार : धडगाव तालुक्यातील कंज्यापाणी येथे ज्वारीच्या पिकात गांजाची लागवड केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. कंजापाणी गावाच्या शिवारातील ज्वारी पीक असलेल्या शेतामध्ये बेकायदेशीररित्या गांजा रोपांची लागवड केल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेशन शाखेला मिळाली होती. एलसीबी व धडगाव पोलीस यांच्या संयुक्त कारवाईत गांजाची झाडे जप्त करण्यात आली असून पोलिसांनी चार लाख ५३ हजार ३२० रुपयांची गांजाची झाडे जप्त केली आहेत. या प्रकरणी शेत मालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिलदार फाड्या पावरा (कंज्यापाणी ता. धडगाव) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे.

पोलीस उप महानिरीक्षक, नाशिक परिक्षेत्र, नाशिक यांचे आदेशान्वये संपुर्ण नाशिक परिक्षेत्रात N.D.P.S. बाबत विशेष मोहिम राबवुन त्याचे समुळ उच्चाटन करण्याचे आदेश दिले होते. त्या अनुषंगाने बुधवारी, 15 सप्टेंबर रोजी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, नंदुरबारचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांना गुप्त बातमीदारामार्फत धडगांव तालुक्यात कंज्यापाणी गाव शिवारात शिलदार फाड्या पावरा याने त्याचे ज्वारी पिकाचे बेकायदेशीररित्या गांजाच्या झाडांची लागवड केली असल्याची खात्रीशीर बातमी मिळाली.

त्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, अपर पोलीस अधीक्षक विजय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर व त्यांचे एक पथक तयार केले. स्थानिक गुन्हे शाखेचे पथक तसेच धडगांव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गोकुळ औताडे व त्यांचे कर्मचारी हे कंज्यापाणी गावाजवळ असलेल्या डोंगराळ भागात पायी गेले असता सदर बातमीमधील संशयीत इसम हा एका ज्वारी पिकाच्या शेतात संशयास्पद हालचाली करत असल्याचे त्यांना दिसून आले.

त्या इसमास ताब्यात घेऊन ज्वारी पिक असलेल्या शेताची पाहणी केली असता शेतात आतील बाजुस ठिकठिकाणी हिरवट रंगाचे गांजा सदृश्य झाडांची लागवड केल्याचे त्यांना दिसून आले, म्हणून स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने संपुर्ण 2.41 हेक्टर असलेली शेती पिंजून काढली. त्यावेळी त्यांना तेथे 4 लाख 53 हजार 320 रुपये किंमतीची एकूण 127 गांजाची झाडे आढळून आली. संशयीत शिलदार फाड्या पावरा याला सर्व कायदेशीर प्रक्रिया करुन ताब्यात घेण्यात आले आहे. त्याच्याविरुध्द गुंगीकारक औषधी द्रव्य व मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५ अन्वये धडगाव पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे