आपल खान्देशराजकीय

जळगावचा सुपुत्र होणार गुजरातचे मुख्यमंत्री?

झूम मराठी वेब मीडिया | गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपाने यांनी दिलेल्या तडकाफडकी राजीनाम्या दिल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. कोरोना काळात त्यांनी केलेल्या निकृष्ट कामामुळे त्यांना राजीनामा देण्याची वेळ आले असल्याचे जाणकार म्हणत आहेत. तर दुसरीकडे मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत ज्यांचे नाव आघाडीच्या काही नेत्यांमध्ये घेतले जात आहे ते म्हणजे खासदार सी.आर.पाटील (चंद्रकांत पाटील). चंद्रकांत पाटील हे मूळ जळगाव जिल्ह्यातील असून तेसध्या ते भारतीय जनता पक्षाचे गुजरात प्रदेशाध्यक्ष आहेत.

गुजरात आणि मराठी माणसाचा वाद हा जूना आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यावेळी मुंबई गुजरातकडे वळावी अशी तत्कालीन गुजरात राज्याचे मुख्यमंत्री मोरारजी देसाई यांची इच्छा होती. मात्र त्यावेळी ते साध्य होऊ शकले नाही. तेव्हापासूनच गुजरात आणि मराठी माणूस यांच्या मधलं होईल हे सर्वश्रुत आहे. मूळ जळगावचे असलेले चंद्रकांत पाटील हे गुजरातमध्ये स्थायिक झाले आणि आता तिथलेच होऊन बसले आहेत. गुजरातच्या राजकारणात त्यांनी चांगलाच जम बसवला असून सध्या ते गुजरात राज्याचे भाजपा प्रदेशाध्यक्ष आहेत. ते जर गुजरातचे मुख्यमंत्री बनले तर या सगळ्या समीकरणांना केराची टोपली मिळणार आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे