झूम मराठी पाचोरा
रोटरी क्लब ऑफ पाचोरा भडगाव चे अध्यक्ष रो. डॉ. बाळकृष्ण पाटील संचलित तेजोदीप नेत्र रुग्णालयाच्या रूग्णसेवेला अकरा वर्ष पूर्ण होत आहेत. तेजोदीप नेत्र रुग्णालयाच्या अकराव्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने
रोटरी क्लब ऑफ पाचोरा भडगाव, व तेजोदीप नेत्र रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने उद्या रविवार रोजी सकाळी 10 वाजता पत्रकार बांधवांसाठी मोफत नेत्र तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले आहे.
तेजोदीप नेत्र रुग्णालय,१ला मजला, बी.ए.मराठे कॉम्प्लेक्स, स्टेशन रोड पाचोरा येथे सकाळी10 वाजता आयोजित सर्व पत्रकार बांधवांची उपस्थिती तालुक्यातील प्रिंट, इलेक्ट्रॉनिक्स, वेबपोर्टल सह सर्व माध्यम समूहात कार्यरत पत्रकार बांधव या शिबिरासाठी सस्नेह आमंत्रित आहेत याची आग्रहपूर्वक नोंद घ्यावी असे आवाहन रोटरी क्लबचे अध्यक्ष रो.डॉ. बाळकृष्ण पाटील, सचिव रो. डॉ. पंकज शिंदे व प्रोजेक्ट डायरेक्टर शिवाजी शिंदे यांनी केले आहे.
शिबिराला उपस्थिती देताना चेहऱ्यावर मास्क अनिवार्य असून सोशल डिस्टंसिंग चे पालन करावे तसेच पत्रकार बांधवांनी शिबिरासाठी येताना आपला जुना चष्मा सोबत आणावा. असे रोटेरियन डॉक्टर बाळकृष्ण पाटील यांनी कळविले आहे.
पाचोरा येथील जास्तीत जास्त पत्रकार बांधवांनी उपस्थिती देऊन उपकृत करावे तसेच सर्व रोटेरियन सदस्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन रोटरी क्लब ऑफ पाचोरा भडगाव तर्फे करण्यात आले आहे.
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा