आपल खान्देशगुन्हेगारी

नियमांचे उल्लंघन करणाऱ्या मुर्तीकारावर गुन्हा

झूम मराठी जळगाव

जळगाव गणेश उत्सव साठी  बनवलेल्या मुर्तीच्या उंची बाबतच्या अटी व शर्ती शासनातर्फे गणेश भक्तांना देण्यात आले होते. मात्र या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या मुर्तीकारावर एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मेहरूण परिसरातील पाण्याच्या हौदाजवळ चंद्रकांत प्रकाश वरणे या मुर्तीकाराने सार्वजनिक मंडळाकरीता लागणारे गणेश मुर्ती चार फुटापेक्षा जास्त उंचीच्या तयार करून विक्री करत असल्याची माहिती एमआयडीसी पोलीसांना९ सप्टेंबर रोजी मिळाली.  रात्री १० वाजेच्या सुमारास एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रताप शिकारे यांच्यासह पथकातील सहाय्यक फौजदार आनंदसिंग पाटील, तुकाराम निंबाळकर, पोहेकॉ रमेश  चौधरी, चेतन सोनवणे, संजय सोनवणे आणि मंदार पाटील यांनी मुर्तीकार चंद्रकांत प्रकाश वरणे (वय-३८) रा. मेहरूण पाण्याच्या हौदाजवळ जळगाव कारवाई केली.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे