ब्रेकिंगविदर्भ

बापरे.,मुलीच्या गळ्यात तब्बल 2 तास नागाने विळखा घातला.,शेवटी नको तेच घडले”

वर्धा : साप म्हटल्यावर भल्याभल्यांना घाम फुटतो.पण,वर्ध्यात झोपलेल्या एका मुलीच्या अंथरुनामध्ये नाग आढळुन आला.झोपेत असलेल्या मुलीच्या अंगावर तब्बल 2 तास हा नाग ठाण मांडुन होता.2 तासानंतर या विषारी सापाने शेवटी त्या मुलीच्या हाताला चावा घेतला आणि दिसेनासा झाला.सदर मुलीस सेवाग्रामच्या अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले.अंगावर काटा आणणारी ही घटना तालुक्याच्या बोरखेडी येथे घडली.गावात या घटनेची माहिती वाऱ्या सारखी पसरताच एकच खळबळ उडाली.

बोरखेडी कला येथील पुर्वा पद्माकर गडकरी (वय 6 वर्ष) ही तिच्या आईसोबत शुक्रवारी रात्रीच्या सुमारास जमिनीवर अंथरून टाकुन झोपली होती.रात्री 12 च्या सुमारास हा विषारी साप दोघी मायलेकींच्या अंगावर चढला,यात आईला जाग आल्यामुळे ती बाजुला झाली.परंतु,तो साप मुलीच्या गळ्याला विळखा घालुन फणा काढून असल्यामुळे तिला स्तब्ध राहण्यास सांगितले,वडिलांनी आजूबाजूला बोलुन घेतले.

तर शेजाऱ्यांनी सर्प मित्राला सुद्धा बोलविले.त्यामुळं मदतीला अनेकांनी धाव घेतली परंतु,कोणताही उपाय चालला नाही.तर बघ्यांची गर्दी वाढल्यामूळे त्या सापास धोका वाटल्याने तो सुद्धा जागा सोडण्यास तयार नव्हता.हा थरार तब्बल 2 तास चालला.हा प्रकार बघुन उपस्थितांच्या अंगावर शहारे आले तर त्या मुलीची अतिशय दयनीय अवस्था झाली होती.शेवटी रात्री 2 च्या सुमारास त्या सापाने मुलीच्या गळ्यातुन विळखा सोडून बाहेर जाण्याचा प्रयत्न केला.परंतु सापाचा काही भाग मुलीच्या पाठीखाली दबुन असल्याने त्या अतिशय विषारी सापाने अखेर त्या मुलीच्या हाताला चावा घेतला आणि दिसेनासा झाला.

सर्पमित्र येईपर्यंत हा प्रकार होऊन गेला होता.उपस्थित असलेल्या गावकऱ्यांनी त्या मुलीस तातडीने सेवाग्रामच्या कस्तूरबा रुग्णालयात भरती केले.सध्या ती मुलगी सेवाग्राम येथे अतिदक्षता विभागात उपचार घेत आहे.पद्माकर गडकरी यांच्या घरी घडलेला प्रकार मनाला चटका लावणारा तितकाच ठरकाप उडविणारा होता.घडलेल्या प्रकाराची बातमी रात्रीच वाऱ्यासारखी पसरली आणि नेमकं काय झालं हे जाणुन घेण्यासाठी गडकरी यांच्याघराकडे धाव घेताना दिसत होते.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे