आपल खान्देश

पाचोरा तालुकयातील बाल हक्क संरक्षण संघ कार्यकारणी निवड व पदग्रहण सोहळा संपन्न

बाल हक्काच्या संरक्षणासाठी बाल हक्क संरक्षण संघ महाराष्ट्र राज्य नेहमीच तत्पर


झूम मराठी वृत्त

पाचोरा तालुकयातील बाल हक्क संरक्षण संघ कार्यकारणी निवड व पदग्रहण सोहळा संस्थापक अध्यक्ष श्री हर्षल पटवारी तसेच सरचिटणीस प्रा. ज्ञानदेव इंगळे यांच्या उपस्थितीत संपन्न  झाला. पाचोरा तालुका अध्यक्षपदी निलेश मराठे यांची नियुक्ती बालकांच्या न्याय व हक्कासाठी लढणारा एकमेव संघ बाल हक्क संरक्षण संघ पाचोरा तालुक्याच्या अध्यक्षपदी सामाजिक कार्यकर्ते निलेश मराठे यांची नियुक्ती संघाचे संस्थापक व प्रदेशाध्यक्ष हर्षल पटवारी यांच्या हस्ते संस्थापक सरचिटणीस प्रा. ज्ञानदेव इंगळे, राज्य उपाध्यक्ष शामिभा पाटील, राज्य सचिव मुकेश जगताप यांच्या उपस्थितीत दी. ७ ऑगस्ट रविवार रोजी पाचोरा येथे विश्रामगृहात घेण्यात आलेल्या कार्यक्रमात पाचोरा तालुका चाळीसगाव तालुका व जामनेर तालुका यांच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या नियुक्ती करण्यात आल्या.

बाल हक्क संरक्षण संघ महाराष्ट्र राज्य चा मूळ मुख्य उद्देश बालकांच्या अधिकाराच रक्षण करून बालकांचे बालपण वाचवण्या साठी बाल स्नेही समाजाची निर्मिती करणे हा आहे याअंतर्गत बालकामगार. बालभिक्षी करू. विधी संघर्षित बालक यांची काळजी व संरक्षणाची गरज असलेले बालक यांच्यासाठी मोहीम राबवण्याचा संघाचा मानस आहे बालका संबंधित विविध विषयावर सरकार व अधिकाऱ्यांचे लक्ष वेधून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी संघ सदैव तत्पर राहील असे प्रतिपादन हर्षल पटवारी यांनी केले याप्रसंगी महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष पदी शमीभा पाटील, महाराष्ट्र राज्य सचिव पदी मुकेश जगताप, उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष पदी चाळीसगाव चे गणेश अग्रवाल तसेच पाचोरा तालुका कार्यकारणी चाळीसगाव तालुका व जामनेर तालुक्याच्या कार्यकारणीची नियुक्ती करण्यात आली. पाचोरा तालुक्यातील नियुक्त्या पुढील प्रमाणे श्री निलेश मराठे पाचोरा तालुकाध्यक्ष श्री दीपक परदेशी उप तालुकाध्यक्ष श्री नंदकुमार शेलकर पाचोरा शहराध्यक्ष जितेंद्र पाटील पाचोरा शहर उपाध्यक्ष  आकाश पवार सचिव  शिव पाटील कार्यालय प्रमुख विविध कलाक्षेत्रातल्या नियुक्त्या  जितेंद्र काळे सर  राहुल पाटील सर  सुशांत जाधव सर  दुषण खंडेलवाल सर यांच्या विविध क्रीडा नृत्य व कलाक्षेत्र तालुकाप्रमुख पदी निवड करण्यात आल्या. नियुक्ती प्रसंगी संस्थापक /प्रदेश अध्यक्ष हर्षल पटवारी व महाराष्ट्र राज्य प्रदेश उपाध्यक्ष शमीभा पाटील मॅम यांनी मोलाचे मार्गदर्शन केले चाळीसगाव येथील राज्य परिवहन मंडळातील कर्मचारी विजय मदनलाल शर्मा यांच्या कार्याची दखल त्यांना राष्ट्रपती पुरस्कार देऊन करण्यात आली होती त्यांचा कार्याचा गौरव म्हणून संगमार्फत त्यांचा सत्कार करण्यात आला. नवनिर्वाचित तालुका अध्यक्ष निलेश मराठे यांनी बाल हक्क संरक्षण संघाच्या मुख्य उद्दिष्टांसाठी सर्वांच्या सहकार्याने परिश्रम घेऊन पदाला न्याय देण्याचा प्रयत्न करू असे आश्वासन देऊन आलेल्या सर्व मान्यवरांचे आभार मानले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे