जळगाव जिल्हा काँग्रेस कमिटीच्या कार्याध्यक्षपदी पाचोऱ्यातील अँड अविनाश भालेराव यांची निवड
त्याच बरोबर भगतसिंग पाटील व शहर जिल्हा काँग्रेसच्या कार्याध्यक्षपदी पराग घोरपडे यांची निवड करण्यात आली आहे
जळगाव जिल्हा काँग्रेस कमिटीच्या कार्याध्यक्षपदी एडवोकेट अविनाश भालेराव व भगतसिंग पाटील व शहर जिल्हा काँग्रेसच्या कार्याध्यक्षपदी पराग घोरपडे यांची निवड करण्यात आली आहे.
जळगाव जिल्हा काँग्रेस कमिटी च्या जिल्हा कार्याध्यक्षपदी पाचोरा येथील एडवोकेट अविनाश भालेराव व यावल येथील भगतसिंग पाटील व जळगाव शहर कार्याध्यक्षपदी पराग घोरपडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रभारी रमेश चेन्नीथाला, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आमदार नानाभाऊ पटोले यांचे आदेशाने सदर नियुक्त करण्यात आली असे नियुक्तीचे पत्र प्रदेश सरचिटणीस नानाभाऊ गावंडे यांनी काढले असून सदर नियुक्त्या या महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या उपाध्यक्ष तथा जिल्ह्याच्या प्रभारी प्रतिभाताई शिंदे यांच्या शिफारशीवरून करण्यात आल्या आहेत असे प्रसार माध्यमातून सांगण्यात आले



